केवळ ३ दिवस बाकी ; SMS द्वारे अवघ्या दोनच मिनिटात करा पॅन आणि आधार लिंक

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – पॅन कार्ड आणि आधार कार्ड हे दोन्ही महत्वाचे कागदपत्र आहेत. सुप्रीम कोर्टाच्या नियमानुसार पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक करणे अनिवार्य आहे. पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक करण्याची अंतिम तारीख ३१ मार्च आहे. त्यामुळे तुमच्या हातात पॅन आणि आधार कार्ड लिंक करण्यासाठी केवळ तीन दिवसांचा अवधी बाकी आहे. आनंदाची बाब अशी की, पॅन आणि आधार कार्ड SMS द्वारे देखील लिंक करता येणे शक्य आहे.

इनकम टॅक्स रिटर्न फाइल करण्यासाठी तसेच रिफंड करिता देखील पॅन आणि आधार कार्ड लिंक करणे आवश्यक आहे. पण अवघ्या दोनच मिनिटात SMS द्वारे पॅन आणि आधार कार्ड लिंक करता येते. इनकम टॅक्स विभागाकडून ही सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. त्यासाठी तुम्हाला कोणते लॉग इन करण्याची आवशयकता नाही.

यासाठी ५६७६७८ किंवा ५६१६१ या नंबरवर एसएमएस पाठवणे गरजेचे आहे. साहजिकच हा एसएमएस तुम्हाला तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबर वरून करावा लागेल.

पॅन आणि आधार कार्ड लिंक करण्यासाठी सोप्य स्टेप्स

  • सर्वप्रथम कॅपिटल लेटर मध्ये UIDPAN लिहावे लागेल.
  • त्यानंतर स्पेस देऊन १२ अंकांचा आधार नंबर लिहा.
  • त्यानंतर स्पेस देऊन १० अंकी पॅन कार्ड नंबर लिहा.
  • हा एसएमएस ५६७६७८ किंवा ५६१६१ वर पाठवा.
  • त्यानंतर तुम्हाला आधार आणि पॅन कार्ड लिंक झाल्याचा एसएमएस येईल.

जसे की तुमचा आधार नंबर १२३४५६७८९३२१ आहे आणि पॅन कार्ड नंबर ABCDE1234F आहे तर तुम्ही याप्रकारे लिहून UIDPAN १२३४५६७८९३२१ ABCDE1234F एसएमएस पाठवू शकता. याशिवाय तुम्ही इनकम टॅक्स विभागाच्या www.incometaxindiaefiling.gov.in वर जाऊन देखील पॅन आणि आधार कार्ड लिंक करू शकता.