कामाची गोष्ट ! पैसे न देता या पध्दतीनं करा PAN कार्ड आणि Aadhaar सोबत लिंक, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  भारतात पॅन कार्ड (PAN card) बरोबर आधार कार्ड (Aadhaar card) जोडणे अनिवार्य केले आहे. तर आता पॅन कार्ड सोबत आधार कार्ड जोडण्यासाठी विनामूल्य लिंक करण्यात येणार आहे. जर व्यक्ती इनकम टॅक्स रिटर्न करीत असेल तर त्याला हे महत्वाचे आहे. याशिवाय, पन्नास हजार रुपयांपेक्षा अधिक रक्कमेच्या बँकिंग व्यवहारासाठी पॅन कार्ड आधार कार्डशी जोडणे आवश्यक आहे. पॅन कार्डला आधार कार्डशी लिंक करण्याची एक सहज आणि सोपी पद्धत आहे. तसेच पॅन कार्ड आणि आधार कार्ड या २ पद्धतीने जोडणी करू शकता. याबाबत सविस्तर जाणून घ्या.

१  – सर्वात पूर्वी (Install tax e-filing) वेबसाइटद्वारे pan-adhar लिंक करण्याची पद्धत

२  – 567678 किंवा 56161 वर मेसेज पाठवून.

१ – ई-फाइलिंग वेबसाइटद्वारे PAN card आणि Adhar card लिंक करण्याची प्रक्रिया :

– सर्वात आधी इनकम टॅक्सच्या वेबसाइटवर जाणे.

– आधार कार्डावरील नाव, पॅन क्रमांक आणि आधार क्रमांक प्रविष्ट करणे

– आधार कार्डात फक्त जन्मतारीखेची वर्ष उल्लेख असल्यास स्क्वॉयर टिक करणे.

– यानंतर कॅप्च कोड प्रविष्ट करणे. कॅप्चा कोडच्या जागी OTP विनंती पाठवू शकता. OTP त्याच्या रजिस्टर्ड मोबाइल नंबरवर पाठवला जाईल.

–  नंतर लिंक आधार बटनवर क्लिक करणे.

२ – एसएमएस सेंड करून पॅनला आधार कार्डला लिंक करण्याची पद्धत :

– फोनवर टाइप करा. UIDPAN १२ अंकाच्या Aadhaar नंबर, आणि १० अंकाचा पॅन नंबर लिहा.

– स्टेप १ मध्ये सांगितलेला एसएमएस 567678 किंवा 56161 वर पाठवणे.

> फॉर्म भरून पॅन-आधार लिंक करण्याची पद्धत –

NSDL पॅन सर्विस प्रोवाइडरकडे जाऊन मॅन्यूअली पॅन कार्डला आधार कार्डशी जोडू करू शकता. या प्रक्रियेनंतर पूर्ण करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे (Documents) लागतील.

> असं करा चेक पॅन आधार कार्ड लिंकच्या स्टेट्सला :

– आयकर विभागाच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन त्या ठिकाणी Aadhaar Status वर क्लिक करा. किंवा incometaxindiaefiling.gov.in/aadhaarstatus लिंक वर क्लिक करा.

– नंतर आपला Adhar आणि pan card क्रमांक एन्टर करणे.

– View Link Aadhaar Status वर क्लिक करा.

– तुम्ही SMS द्वारे Adharcard आणि pan card लिंक स्टेट्स चेक करू शकता. आणि खाली दिलेल्या फॉर्मेटमध्ये SMS लिहून 567678 किंवा 56161 नंबरवर पाठवा.

– UIDPAN १२ अंकी आधार क्रमांक १० अंकांचा पॅन क्रमांक.