‘या’ 4 सोप्या स्टेप्स फॉलो करा अन् PAN कार्डला Aadhaar कार्डशी घरबसल्या करा लिंक, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम – पॅन कार्ड (PAN Card) आधार कार्ड (Aadhaar Card) ला लिंक करण्याची मर्यादा 31 मार्च 2020 ला समाप्त होईल. या तारखेपर्यंत तुम्ही तुमचे दस्तावेज लिंक केले नाहीत तर तुम्ही अडचणीत येऊ शकता. कारण आयकर विभागाच्या मते निश्चित वेळेत आधार लिंक केले नाही तर तुमचे पॅन कार्ड निष्क्रिय होऊ शकते. यानंतर कोणत्याही आवश्यक ट्रांजॅक्शनसाठी पॅन नंबर दिल्यास तुम्हाला 10,000 रुपयांचा दंड होऊ शकतो. हे दोन्ही दस्तावेज लिंक करुन तुम्ही या दंडापासून वाचू शकतात.

काय आहे PAN Card-Aadhaar Card लिंक करण्याची प्रक्रिया –

1. सर्वात आधी आयकर विभागाच्या पोर्टलवर जाऊन लॉग ऑन करा.

2. वेबसाइटच्या डाव्या बाजूला ‘Link Aadhaar’ नावाचा पर्याय दिसेल.

3. या लिंकवर क्लिक केल्यावर नवीन टॅब सुरु होईल. यात तुम्हाला पॅन नंबर, आधार नंबर आणि आधार कार्ड वर असलेले नाव टाकावे लागेल.

4. यानंतर नियम आणि अटी वाचून त्यावर ओके करुन त्यात कॅच्पा कोड टाका. यात तुम्ही दोन्ही दस्तावेज लिंक करु शकतात.

यानंतर तुम्हाला कन्फर्मेशन मिळेल आणि दोन्ही दस्तावेज लिंक करण्याची सूचना मिळेल. तुम्हाला पोर्टलवर लॉगिन करण्याची आवश्यकता नाही. तुमच्याकडे फक्त 12 अंकी आधार कार्ड नंबर आणि पॅन कार्डचे विवरण असणे आवश्यक आहे. याशिवाय तुम्ही SMS द्वारे देखील हे दस्तावेज लिंक करु शकतात.

SMS च्या माध्यमातून करा आधार पॅन लिंक –
यासाठी तुम्हाला मेसेजमध्ये UIDPAN<12-अंकी आधार नंबर><10 – अंकी PAN> टाइप करावे लागेल आणि हे 567678 किंवा 56161 वर सेंड करावे लागेल.