फक्त एक SMS करा अन् घरबसल्या Aadhaar Card करा लॉक; नाही होणार पर्सनल डाटा लिक, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  सरकारी असो वा खासगी काम आधारकार्ड एक महत्त्वाचे डॉक्युमेंट झाले आहे. यामध्ये 12 अंकी युनिक नंबरने व्यक्तीची ओळख स्पष्ट होते. मात्र, हाच आधारक्रमांक चुकीच्या लोकाच्या हाती लागला तर त्याचा गैरवापर होऊ शकतो. तुम्हालाही आधारकार्ड एसएमएसच्या माध्यमातून घरबसल्या लॉक करता येऊ शकते.

‘युनिक आयडेंटिफिकेशन ऑथोरिटी ऑफ इंडिया’ने ही सुविधा नागरिकांसाठी सुरु केली आहे. जेव्हा आधारकार्ड गहाळ होते तेव्हा या सुविधेचा मोठा फायदा होतो. आधारकार्डच्या माध्यमातून तुमची सर्व माहिती मिळू शकते.

रजिस्टर्ड क्रमांकावर पाठवा SMS

आधारकार्ड लॉक करण्यासाठी तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल क्रमांकावर GETOTP लिहून एसएमएस करावा. असे केल्यानंतर तुम्हाला तुमच्या मोबाईल क्रमांकावर SMS येईल. या ओटीपीला LOCKUID आधार क्रमांक लिहून दुसऱ्यांदा 1947 या क्रमांकावर पाठवणे गरजेचे आहे. असे केल्यानंतर तुमचे आधारकार्ड लॉक होईल. त्यानंतर तुमच्या परवानगीशिवाय कोणीही याचा वापर करू शकणार नाहीत.

गरज पडल्यास अनलॉकही येणार करता

जेव्हा आपण आधारकार्ड लॉक कराल तेव्हा पुन्हा आधारकार्ड वापरायचे कसे याची चिंता करू नका. आधारकार्ड अनलॉक करण्याचा पर्यायही दिला जातो. तुम्हाला तीच प्रक्रिया पुन्हा करावी लागणार आहे. GETOTP आधार क्रमांक लिहून 1947 वर पाठवावा लागणार आहे. OTP आल्यानंतर तुम्हाला UNLOCKUID आधारक्रमांकासह पु्न्हा 1947 वर पाठवणे गरजेचे आहे.

अनेक सुविधा झाल्या ऑनलाइन

डिजिटायझेशनच्या दरम्यान सरकारने आधारकार्ड संबंधित अनेक सुविधा ऑनलाईन करण्यास सुरुवात केली आहे. यामुळे भाडेकरूंना मोठा फायदा होणार आहे. भाडेकरूंना घरचा पत्ता अपडेट करण्याची प्रक्रिया सोपी केली आहे. आता त्यांना घर बदल्यानंतर आधार केंद्रावर जाण्याची गरज भासणार नाही. ते ऑनलाईन रेंट अ‍ॅग्रीमेट जोडणे गरजेचे आहे. पीडीएफ कॉपी किंवा इतर आवश्यक कागदपत्रे सबमिट करणे गरजेचे आहे.