Blood Pressure : ’सायलेंट किलर’ ब्लड प्रेशरची लक्षणं आणि घरगुती उपाय जाणून घ्या

पोलिसनामा ऑनलाईन – ब्लड प्रेशर वाढणे एक गंभीर समस्या आहे, यावर वेळीच उपचार न केल्यास रूग्णाचा जीव जाऊ शकतो. ब्लड प्रेशर वाढल्याने धमण्यांवर रक्ताचा दाब सतत वाढतो. अशा स्थितीला हाय ब्लड प्रेशर किंवा हायपरटेंशन म्हणतात. या दबावामुळे अनेक समस्या होऊ शकतात. यामध्ये हृदयरोगांचा सुद्धा समावेश आहे. उच्च रक्तदाबाला ’सायलेंट किलर’ सुद्धा म्हटले जाते.

ब्लड प्रेशर का वाढते
ब्लड प्रेशर वाढण्याची अनेक कारणे आहेत. ब्लड प्रेशर वाढण्याच्या मुख्य कारणांमध्ये अचानक औषध बंद करणे, अनहेल्दी डाएट, किडनीशी संबंधीत औषंधाचे सेवन, एक्सरसाइज न करणे, थंडीत नसा आकुंचन पावणे आणि अति तणाव घेणे इत्यादीचा समावेश आहे.

ब्लड प्रेशरची लक्षणे
ब्लड प्रेशर वाढल्यास रूग्णाच्या छातीत वेदना होतात, श्वास घेण्यास त्रास होतो, कमजोरी, दृष्टीमध्ये बदल, बोलताना अडखळणे आणि भयंकर डोकेदुखी इत्यादी समस्या होऊ शकतात. अशाप्रकारची लक्षणे दिसल्यास ताबडतोब डॉक्टरांकडे जा.

ब्लड प्रेशर किती असावे
नॉर्मल ब्लड प्रेशर 90 / 60 एमएमएचजी आणि 120 / 80एमएमएचच्या दरम्यान मानले जाते. जर तुमचा रक्तदाब 180/120 किंवा यापेक्षा जास्त आहे तर तुम्हाला आपत्कालीन देखभाल घेतली पाहिजे. ब्लड प्रेशर वाढल्याने अनेक अवयवांचे नुकसान होऊ शकते.

50 ते 55 वर्षांच्या पुरुषांचे ब्लड प्रेशर 128-85एमएमएचजी आणि महिलाचे 129-85एमएमएचजी असायला हवे. तर 60 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या पुरुषांचे ब्लड प्रेशर 135-88एमएमएचजी आणि महिलांचे 134-84एमएमएचजी असावे.

ब्लड प्रेशरसाठी गोळी
ब्लड प्रेशर नियंत्रित करण्यासाठी बीपी टेल 40 एमजी टॅबलेटचा वापर केला जातो. हे औषध ब्लड प्रेशर कमी करून भविष्यात होणारे हार्ट अटॅक आणि स्ट्रोकच्या प्रतिबंधासाठी मदत करते. मात्र, कोणतेही औषध घेताना डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्यावे.

ब्लड प्रेशरचे घरगुती उपाय

1 आठवड्यात 150 मिनिटे, किंवा आठवड्याच्या बहुतांश दिवशी सुमारे 30 मिनिटे एक्सरसाइज केली पाहिजे.

2 कडधान्य, फळे, भाज्या आणि कमी फॅटवाली डेयरी उत्पादने असलेला आहार घ्या. सोडियमचे थोडे जरी प्रमाण कमी केले तरी हृदयात सुधारणा होईल आणि रक्तदाब कमी होईल.

3 दारूचे सेवन बंद करा. स्मोकिंग आणि कॅफीनच्या सेवनापासून दूर राहा.

4 तणावापासून सुद्धा दूर राहा.