5 वर्षापेक्षा कमी वय असलेल्या मुलांचं बनवा निळं Aadhaar कार्ड, जाणून घ्या सर्वकाही

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशातील आधारकार्ड बनविणारी सरकारी संस्था युनिक आयडींटिफिकेशन ऑथॅरिटी ऑफ इंडिया (UIDAF) यांनी ट्विटरवर माहिती देत म्हणाले की मुलांसाठी बाल आधार बनवावे लागेल. हे आधार कार्ड ५ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांसाठी बनविलेले आहे. मुलांना दिलेला आधार निळ्या रंगाचा आहे आणि ५ वर्षांपेक्षा जास्त वय झाल्यानंतर आधार अवैध होतो. म्हणूनच त्यांना जवळच्या कायम आधार केंद्रावर जाऊन आधार क्रमांकासह नोंदणीकृत मुलांची बायोमेट्रिक तपशील द्यावी लागेल.

सामान्य आधारपेक्षा किती वेगळा आहे बाल आधार
UIDAF ने स्पष्ट केले आहे की बाल आधारमध्ये बायोमेट्रिक आयडींटिफिकेशनसारखे आइरिंग स्कॅन किंवा फिंगरप्रिंट स्कॅन महत्वाचे नाही. जेथे जेथे मुलाची ओळख आवश्यक असते तेथे पालक त्याच्यासोबत असतील. तथापि, मुलाचे वय पाच वर्ष ओलांडताच, त्याला सामान्य आधार कार्ड दिले जाईल. यात सर्व बायोमेट्रिक तपशील असतील.

आपल्या मुलांचे बाल आधार कसे बनवाल?
तुमच्या मुलासह आधार केंद्रात जा आणि फॉर्म भरा. केंद्रामध्ये मुलाचा आणि पालकांमधील एकाचा जन्म दाखला घेऊन जाणे आवश्यक आहे. केंद्रात मुलाचा फोटो काढला जाईल जो आधारकार्डवर दिसेल. येथे मुलाची कोणतीही बायोमेट्रिक डिटेल्स घेतली जाणार नाही. बाल आधार पालकांपैकी एकाच्या आधार कार्डशी लिंक केले जाईल. त्यासाठी तुम्हाला रजिस्टर मोबाईल क्रमांक द्यावा लागेल. व्हेरिफिकेशन आणि रजिस्ट्रेशननंतर कन्फर्मेशन मॅसेज मोबाईल क्रमांकावर येईल. हा मॅसेज आल्यानंतर ६० दिवसांच्या आत माता पित्यांच्या रजिस्टर पत्त्यावर बाल आधार पाठविले जाईल.

बाल आधार निळ्या रंगाचे असते
निळ्या रंगाचे हे आधार कार्ड इतर सामान्य आधार कार्डसारखेच आहे. नवीन नियमांनुसार UIDAF निळ्या रंगाचे आधार ५ वर्षांच्या मुलांसाठी जाहीर करत आहेत. बालकाला ५ वर्ष पूर्ण झाल्यानंतर आधार असामान्य होईल आणि त्याला जवळच्या नोंदणीकृत केंद्रात जावे लागेल आणि या आधार क्रमांकावरून त्याचा लोकसांख्यिकीय आणि बायोमेट्रिक तपशील द्यावा लागेल. अन्यथा आधार अवैध ठरेल.