जाणून घ्या : घरबसल्या असं मिळवा डिजिटल Voter ID

पोलीसनामा ऑनलाईन टीम – आता तुम्हाला तुमचं मतदान ओळखपत्र (Voter ID /Election Card) आधार कार्ड (Aadhar Card) प्रमाणेच मोबाईलमध्ये बाळगणं सहज शक्य होणार आहे. कारण मतदान ओळखपत्र फोनवर डाऊनलोड करण्याची सुविधा देण्यात आली आहे. भारतीय निवडणूक आयोगानं (Election Commission of India) 25 जानेवारी रोजी डिजिटल वोटर आयडी कार्डची सुरुवात केली आहे. मतदान ओळखपत्र आपल्या मोबाईल फोनवर कसं डाऊनलोड करायचं याबाबत आज आपण माहिती जाणून घेणार आहोत.

‘नॅशनल वोटर सर्व्हीस पोर्टलवरून डिजिटल वोटर कार्ड डाऊनलोड केलं जाऊ शकतं’

e-EPIC एक सुरक्षित पोर्टेबल डॉक्युमेंट (PDF) फॉर्मेट आहे. हे मोबाईल किंवा कॉम्प्युटर सेल्फ प्रिंटेबल रुपात डाऊनलोड केलं जाऊ शकतं. वोटर या डिजिटल कार्डला आपल्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करून स्टोर करू शकता. तुम्ही याची प्रिंटही काढू शकता. नॅशनल वोटर सर्व्हीस पोर्टलवरून डिजिटल वोटर कार्ड डाऊनलोड केलं जाऊ शकतं.

e-EPIC (Electors Photo Identity Card – EPIC) म्हणजे काय ?

हे खूपच सुरक्षित असं पीडीएफ स्वरूपातील मतदार ओळखपत्र आहे. हे ओळखपत्र तुम्ही मोबाईल किंवा कॉम्प्युटरवर डाऊनलोड करू शकता. याला तु्म्ही मोबईल मध्ये स्टोर करू शकता. इतकंच नाही तर हे डिजिटल लॉकरमध्ये पीडीएफ स्वरूपात ठेवलं जाणंही शक्य होणार आहे. तुम्ही याची प्रिंट काढून ते लॅमिनेटही करू शकता.

कसं डाऊनलोड कराल डिजिटल वोटर आयडी कार्ड ?

आपलं डिजिटल वोटर आयडी कार्ड डाऊनलोड करण्यासाठी तुम्हाला पुढील काही स्टेप्स फॉलो कराव्या लागणार आहेत.

– डिजिटल वोटर आयडी कार्ड डाऊनलोड करण्यासाठी तुम्हाला https://voterportal.eci.gov.in/ या वेबासाईटवर जावं लागणार आहे.
– यानंतर तुम्हाला इथं एक अकाऊंट बनवावं लागेल.
– लॉगईन करून e-EPIC या पर्यायावर क्लिक करा
– यानंतर e-EPIC नंबर किंवा रेफरंस नंबर टाकावा लागेल.
– आता तुम्हाला तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर एक OPT येईल.
– हा OTP सबमिट केल्यानंतर e-EPIC डाऊनलोड करून तुमचं कार्ड प्राप्त करू शकता.

कार्डवरील रजिस्टर्ड मोबाईल नंबर वेगळा असेल तर काय कराल ?

जर तुमच्या कार्डवरील रजिस्टर्ड मोबाईल नंबर वेगळा असेल तर हे कार्ड डाऊनलोड करण्यासाठी तुम्हाला KYC ची प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. KYC द्वारे नंबर अपडेट झाल्यानंतर तु्म्ही तुमचं कार्ड सहज डाऊनलोड करून मोबाईलमध्ये सेव्ह करू शकता.