Good News : बदलला Driving Licence शी संबंधीत ‘हा’ मोठा नियम, जाणून घ्या कसा आणि कुणाला होणार फायदा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जे लोक शिक्षण, नोकरी किंवा अन्य कोणत्याही कामासाठी मोठ्या कालावधीसाठी परदेशात जातात, त्यांना आयडीपी म्हणजे इंटरनॅशनल ड्रायव्हिंग परमीट (International Driving Permit) ची आवश्यकता असते. परदेशात वाहन चालवण्यासाठी आयडीपी सोबत असणे अनिवार्य आहे. यासाठी अगोदर वीजाची आवश्यकता असते, परंतु आता याची आवश्यकता असणार नाही. रस्ते परिवहन आणि राज्यमार्ग मंत्रालयाने इंटरनॅशनल ड्रायव्हिंग परमिट (IDP) साठी वीजाची अनिवार्यता समाप्त केली आहे. याचा अर्थ असा आहे की, जर अर्जदाराकडे पासपोर्ट असेल तर तो वीजाच्या अर्जाच्या आधारावर इंटरनॅशल ड्रायव्हिंग परमिट मिळवू शकतो.

आतापर्यंत आयडीपीच्या फॉर्मसोबत ड्रायव्हिंग लायसन्सची फोटो कॉपी, पासपोर्ट साईज फोटो, आधार कार्डासोबतच पासपोर्ट आणि वीजाची कॉपी सुद्धा द्यावी लागत होती. अशा स्थितीत अनेकदा वीजा न मिळाल्यास लोकांना आयडीपी मिळत नव्हते, परंतु, आता अन्य कागदपत्रांसोबत केवळ पासपोर्ट आणि वीजा अर्जाची कॉपी सादर करून आयडीपी प्राप्त करता येईल.

किती द्यावे लागेल शुल्क?
केंद्रीय रस्ते परिवहन आणि राज्यमार्ग मंत्रालयाने आयडीपीसाठी वीजाची अनिवार्यता समाप्त केली आहे. दुसरीकडे मंत्रालयाने आयडीपीच्या शुल्कात काही बदल केले आहेत. मीडिया रिपोर्टनुसार, नवीन आयडीपीचे अर्जशुल्क एक हजार रुपये ठेवण्यात आले आहे.

जर एखादी व्यक्ती परदेशात असेल आणि त्याचा वीजा वाढवण्यात आला आहे तर या स्थितीत आयडीपीचा कालावधी वाढवण्यासाठी त्यांना संबंधित दुतावासाच्या माध्यमातून अर्ज करावा लागेल. यासाठी 2 हजार रुपये अतिरिक्त फी द्यावी लागेल.

अर्जदाराला ऑनलाइन अर्ज करतेवेळी वैध ड्रायव्हिंग लायसन्सचा पुरावा, पासपोर्ट फोटो, नागरिकत्व प्रमाणपत्र आणि वैध पासपोर्टचा पुरावा द्यावा लागेल. आयडीपीसाठी अर्जदाराला त्याच आरटीओ कार्यालयात अर्ज करावा लागेल, जेथून त्याचे ड्रायव्हिंग लायसन्स जारी झाले होते.

मेडिकल सर्टिफिकेटची अट सुद्धा रद्द
मंत्रालयाने म्हटले की, भारतात आयडीपीसाठी अर्ज करताना वैध वीजासोबत मेडिकल सर्टिफिकेटची अट सुद्धा हटवणत आली आहे. ज्या नागरिकांकडे वैध ड्रायव्हिंग लायसन्स आहे, त्यास दुसर्‍या मेडिकल सर्टिफिकेटची आवश्यकता असणार नाही.

याबाबत मंत्रालयाच्या नोटिफिकेशननुसार, असे देश जिथे वीजा आगमन झाल्यानंतर जारी केला जातो किंवा अंतिम वेळी वीजा जारी केला जातो, तिथे प्रवास करण्यापूर्वी भारतात आयडीपीसाठी अर्ज करताना वीजा उपलब्ध होत नाही. यासाठी आता विनावीजा सुद्धा आयडीपीसाठी अर्ज करता येईल.