‘Tik Tok’ वर घरबसल्या कमवा लाखो रुपये ! जाणून घ्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – टिकटॉक अ‍ॅपची चाहत्यांमध्ये खूपच क्रेज पाहायला मिळत आहे. मोनरंजनासाठी हे अ‍ॅप मोठ्या प्रमाणात वापरलं जातं. पंरतु तुम्हाला माहिती आहे का टिकटॉक अ‍ॅप केवळ मनोरंजानासाठीच नाही तर तुम्ही यावरून पैसेही कमवू शकता. हे व्हिडीओ अ‍ॅप तुमच्या उत्पन्नाचं चांगलं साधन बनू शकतं. तुम्ही टिकटॉकमधून लाखोंची कमाई करू शकता. यासाठी काही पद्धतींची तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. याबाबत आज आपण जाणून घेणार आहोत.

तुमच्याकडे जर टिकटॉक अ‍ॅप नसेल तर तुम्हाला आधी ते अ‍ॅप डाऊनलोड करावं लागेल. तुम्ही तुमच्या आवडीनुसार आणि इच्छेनुसार व्हिडीओ तयार करू शकता. तुम्हाला जास्तीत जास्त लोकांनी फॉलो करणं गरजेचं आहे.

टिकटॉकसाठी काही महत्त्वाच्या टीप्स-

तुम्ही टिकटॉकवर कोणत्याही विषयावर व्हिडीओ तयार करू शकता.
तुमचं टिकटॉक प्रोफाईल युट्युब आणि इंस्टाग्राम अकाऊंटला लिकं करा. ज्यामुळे तुमचे फॉलोवर्स वाढण्यास मदत होईल.
तुमचे व्हिडीओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. जर असे झाले तर तुमच्या व्हिडीओचे ऑर्गेनिक ट्राफिक वाढेल.
जास्तीत जास्त हॅशटॅगचा वापर करा.
जर तुमच्या प्रोफाईलसोबत जास्तीत जास्त लोक जोडले गेले तर एखादी कंपनी तुम्हाला त्यांचे प्रॉडक्ट जाहिरातीसाठी देऊ शकते. जाहिरतीच्या माध्यमातून तुम्ही लाखोंची कमाई करू शकता. यासाठी तुमच्या फॉलोवर्सची संख्या जास्त असणं गरजेचं आहे.

फेसबुक पेज लाईक कराhttps://www.facebook.com/policenama/