How to Make Protein Powder | प्रोटीन पावडर बनवण्यासाठी कोणत्या वस्तूंची गरज भासते, येथे जाणून घ्या घटक आणि कृती

पोलीसनामा ऑनलाइन टीम – How to Make Protein Powder | तुम्ही स्वत: ची प्रोटीन पावडर (Protein powder) बनवण्याचा विचार करत आहात का ? मग ही सर्वोत्तम कल्पना आहे. कारण तुम्ही सहज नॅचरल प्रोटीन पावडर बनवू शकता. ज्यात कोणतेही प्रिझर्वेटिव्ह नसतात. घरी प्रोटीन पावडर बनवण्याचे कोणते फायदे आहेत आणि हेल्दी प्रोटीन पावडर (Healthy Protein Powder) कशी बनवावी ते जाणून घेवूया… (How to Make Protein Powder)

 

प्रोटीन बेससाठी काय घ्यावे

प्रोटीन बेस (Protein Base) तयार करण्यासाठी आपल्याला आवश्यक आहे स्पिरुलिना (2 मोठे चमचे, 8 ग्रॅम प्रोटीन इतके) पौष्टिक यीस्ट (3 मोठे चमचे, 12 ग्रॅम प्रोटीन इतके) घेणे आवश्यक आहे.

 

सीड्स कसे निवडायचे

खालील सीड्समधून तुम्ही कोणतेही 3-4 सीड्स (Seeds) निवडू शकता. प्रत्येक शंभर ग्रॅम सीड्समध्ये 12 ग्रॅमपेक्षा जास्त प्रोटीन असतात. (How to Make Protein Powder)

1. चिया सीड्स (Chia seeds) (3 मोठे चमचे)
2. सूर्यफूलाच्या बिया (Sunflower Seeds) (3 मोठे चमचे)
3. आळशीच्या बिया (Flax seeds) (3 मोठे चमचे)
4. भोपळ्याच्या बिया (Pumpkin seeds) (4 मोठे चमचे)
5. अंकुरित ब्राऊन राईस पावडर (Sprouted Brown Rice Powder) (3 चमचे)
6. क्विनोआ, शिजवलेले (1 कप)

 

प्रोटीन अ‍ॅड – इनसाठी पर्याय

अ‍ॅड – इन्ससाठी, तुम्ही हे आयटम निवडू शकता, जे सुमारे 8 ते 12 ग्रॅम प्रोटीन देतात.

1. बदाम (Almonds) (1/2 कप)
2. कॅरब पावडर (Carb Powder) (1/2 कप)
3. मॅका पावडर (Maca Powder) (1/4 कप)

 

हे ड्राय फ्रुट्स निवडा

खालील ड्राय फ्रुट्स (Dry Fruits) निवडा. यामध्ये प्रोटीन जास्त असतात आणि प्रत्येक सर्व्हिंगमध्ये तुम्हाला 9 ते 14 ग्रॅम प्रोटीन मिळतील.

1. शेंगदाणे (Peanuts), सुके आणि भाजलेले (1/4 कप)
2. पिस्ता (Pistachio), सुके आणि भाजलेले (1/4 कप)
3. बदाम (1/4 कप)
4. काजू (Cashew) (1/4 कप)
5. हेझलनट्स (Hazelnuts) (1/4 कप)
6. खोबर (Coconut) (1/4 कप)

 

कसे बनवावे

या सर्व गोष्टी एकत्र करून नीट बारीक करून पावडर बनवा. तुम्ही दिवसातून एकदा दुधासोबत दोन चमचे प्रोटीन पावडर घेऊ शकता.

 

 

Web Title : –  How to Make Protein Powder | story how to make protein powder at home and what are the things needed to make protein powder

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा