आता पेट्रोल पंपाची जागा घेणार ‘ई-चार्जिंग’ स्टेशन, तुम्हीही सुरू करा अन् ‘कमवा’ मोठी रक्‍कम, जाणून घ्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – जीएसटी परिषदेच्या ३६ व्या बैठकीत ई-वाहन चार्जरवरील जीएसटीचे दर कमी केले आहेत. तसेच इलेक्ट्रिक वाहनांवरील जीएसटी दर १२ टक्क्यांवरून ५ टक्क्यांवर आणले आहे. आता पेट्रोल पंपाऐवजी चार्जिंग स्टेशन सुरू करून पैसे मिळविण्याची मोठी संधी मिळत आहे. भारतात, जपानची इलेक्ट्रॉनिक कंपनी पॅनासोनिक २५ शहरांमध्ये १ लाख स्ट्रॉंग चार्जिंग स्टेशन स्थापित करण्याची तयारी करत आहे. भारतातील इलेक्ट्रिक वाहनांची वाढती संख्या बघून त्याच्या तुलनेत चार्जिंग स्टेशन उपलब्ध करून देण्याकडे कंपनीचे लक्ष आहे. या व्यतिरिक्त फ्रेंचाइजी देखील देणार. कंपनी पार्किंग स्टेशन, मॉल, पेट्रोल पंप इत्यादी ठिकाणी चार्जिंग स्टेशन करणार आहेत. केंद्र सरकारचे उद्दीष्ट आहे की २०३० पर्यंत देशातील २५ ते ३० टक्के वाहने इलेक्ट्रिक असली पाहिजेत जेणेकरून प्रदूषण कमी होऊ शकेल. चालू आर्थिक वर्षात सुमारे साडेचार हजार चार्जिंग स्टेशन उभारण्याचे सरकारचे उद्दीष्ट आहे.

काय आहे प्लॅन-
पॅनासोनिकने सांगितले की, पहिल्या टप्प्यात, पॅनासोनिकने स्मार्ट ई आणि क्यूक्विक इलेक्ट्रिक मोबिलिटी सर्व्हिस प्रदान करण्यासाठी भागीदारी केली आहे.

१] या अंतर्गत पॅनासॉनिक दिल्ली-एनसीआर क्षेत्रामध्ये १५० स्मार्ट ई इलेक्ट्रिक थ्री व्हीलर्स आणि २५ क्यूक्विक २ व्हीलर ईव्हीए चार्जिंग सेवा स्थापित करणार आहे.

२] Nymbus च्या अंतर्गत फिजिकल कंपोनेंट सारखे चार्जिग स्टेशन, स्वैप स्टेशन, ऑनबोर्ड चार्ज, टेलीमेटिक्स सिस्टम आणि वर्चुअल कंपोनेंट जसे की, क्लाउड
सर्विस, एनालिटिक्स, इंट्यूटिव डैशबोर्ड आणि आर्टिफिशियल इंटेलिजेंस सेवा दिली जाणार. या सेवेचा उद्देश वैयक्तिक ईव्ही वापरकर्ते, ईव्ही फ्लीट मालक, ईकॉमर्स आणि लॉजिस्टिक्स कंपन्यांना मदत करणे आहे.

३] नासॉनिक इंडियाचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मनीष शर्मा यांचे म्हणणे आहे की, ही सेवा सुरू केल्याने भारतात इलेक्ट्रिक व्हीकल्स खरेदी करणाऱ्या लोकांना मदत मिळणार आहे.

या ठिकाणी सुरु करणार स्टेशन-
१] कंपनी प्रथम दिल्ली, पुणे, बेंगलोर, चेन्नई, अमरावती, हैदराबाद, गुरुग्राम, नोएडा आणि गाझियाबाद येथे एक चार्जिंग स्टेशन केंद्र बनवेल. येथून त्याचा विस्तार होईल.

एक स्टेशनची किंमत ४ लाख रुपये-
एका अंदाजानुसार इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशनची किंमत सुमारे ४ लाख रुपये असेल. यासाठी वेगळी वीजपुरवठा करण्याची उपाय योजना आहे.

काय आहे सरकारचा प्लॅन
इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी सरकार वेगाने काम करत आहे. इलेक्ट्रिक वाहनांसाठी राष्ट्रीय महामार्गावरील चार्जिंग स्टेशन बसवण्याची काम वेगाने वाढवले जाऊ शकते. या अंमलबजावणीसाठी १५ राज्यांनी नोडल एजन्सीची घोषणा केली आहे. एका वर्षाच्या आत महामार्गावर एक चार्जिंग स्टेशन होईल ज्यामध्ये ४,००० पेक्षा जास्त ईव्ही चार्जिंग स्टेशन स्थापित केले जातील.

एक चार्जिंग स्टेशन प्रत्येक ३० किमी वर दिसेल- दर ३० किलोमीटर अंतरावर चार्जिंग स्टेशन उपलब्ध असतील ज्यासाठी सरकार १,०५० कोटी रुपयांचे अनुदान देखील देणार. ही चार्जिंग स्टेशन एनटीपीसी, पॉवर ग्रिडसोबत एकत्रितपणे लावण्यात येतील. २०३० पर्यंत ४० टक्के इलेक्ट्रिक वाहनांचे लक्ष आहे.

या कंपन्या लावणार चार्जिंग स्टेशन- दिल्ली ट्रान्सको लिमिटेड, गुजरात एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी, उत्तराखंड पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड, पंजाब स्टेट पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड, बेस्कॉम, टीएसआरडीको या नोडल एजन्सीज चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चर लावणार.

आरोग्यविषयक वृत्त –