खुशखबर ! सिमकार्ड प्रमाणे विमा पॉलिसीही करता येणार पोर्ट

how-to-port-insurance-policy

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जर आपल्याला एखाद्या सिमकार्डची सेवा आवडली नाही तर आपण सिमकार्ड पोर्टेबिलिटी करून दुसऱ्या कंपनीची सेवा घेऊ शकतो. अगदी त्याचप्रमाणं आता विमा पॉलिसीदेखील पोर्ट करता येणार आहे.

जर तुम्ही घेतलेल्या विमा कंपनीची सेवा तुम्हाला आवडली नसेल तर तुम्ही तुमची विमा पॉलिसी दुसऱ्या कंपनीमध्ये सहजरित्या पोर्ट करू शकता. मात्र या योजनेमध्ये फक्त हेल्थ पॉलिसी पोर्ट करता येते. २०११ साली भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाने (IRDAI) हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसी पोर्ट करण्याची परवानगी दिली होती. परंतु त्याबद्दलची प्रक्रिया लोकांना माहीत नसल्यामुळे या सेवेचा लाभ घेता आला नाही.

अशी करा तुमची पॉलिसी पोर्ट

–सर्वप्रथम मूळ पॉलिसीच्या अंतिम मुदतीच्या कमीत कमी ४५-६० दिवस आधी नव्या विमा कंपनीशी संपर्क करा.

–त्यानंतर ग्राहकाला एक प्रपोजल अर्ज भरावा लागेल.

–नवी इन्श्युरन्स कंपनी जुन्या इन्श्युरन्स कंपनीशी संपर्क करुन मेडिकल आणि क्लेम हिस्ट्रीची पडताळणी करेल.

–नव्या इन्श्युरन्स कंपनीला आवश्यक ती सर्व माहिती आणि कागदपत्र मिळाल्यानंतर १५ दिवसांच्या आत आपली पॉलिसी स्वीकारावी लागेल.

हल्ली सर्वच कंपन्यांचा आपल्या ग्राहकांना अधिक चांगल्या सुविधा पुरवण्याकडे कल आहे. मग ती मोबाईल ऑपरेटर कंपनी असो, डीटीएच कंपनी असो अथवा विमा कंपनी असो. एखाद्या कंपनीची सेवा तुम्हाला पसंत नसेल तर तुम्ही दुसऱ्या कंपनीची सेवा स्विकारू शकता. कंपन्यांची वाढती स्पर्धा आणि कमीत भावात जास्तीत जास्त फायदा देणाऱ्या सेवा यामुळे कंपन्यांमध्ये देखील चढाओढ पाहायला मिळते. जर तुम्हाला कंपनीने दिलेल्या सुविधा आवडत नसतील तर आयुष्यभर त्याच कंपन्यांची सेवा घेण्याची गरज नाही. ग्राहकांसाठी आता पोर्टेबिलिटीचा पर्याय उपलब्ध आहे.