Coronavirus : जोपर्यंत ‘वॅक्सीन’ येत नाही, ‘कोरोना’पासून वाचण्यासाठी वापराव्या लागतील ‘या’ पद्धती

नवी दिल्ली : वृत्त संस्था – कोरोना व्हायरसच्या वाढत्या संक्रमणामुळे जगातील 200पेक्षा जास्त देश त्रस्त आहेत. प्रत्येक दिवशी कोरोना संक्रमण आणि त्यामुळे होणार्‍या मृत्यूंचा आकडा वाढत चालला आहे. जगभरातील लोकांना लवकरात लवकर कोरोनाच्या वॅक्सीनची प्रतिक्षा आहे. भारतासह अमेरिका, चीन, रशिया, ब्रिटन, इस्रायल इत्यादी अनेक देशांतील शास्त्रज्ञ वॅक्सीन बनवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. जगभरात 120 पेक्षा जास्त वॅक्सीनवर काम सुरू आहे, ज्यापैकी 21 पेक्षा जास्त वॅक्सीन क्लिनिकल ट्रायलच्या फेजमध्ये आहेत. वॅक्सीन येण्यास सध्या वेळ आहे, परंतु जोपर्यंत वॅक्सीन येत नाही, तोपर्यंत कोरोनापासून बचाव करण्यासाठी कोणते उपाय केले पाहिजेत ? यावर तज्ज्ञ सुरूवातीपासून सोशल डिस्टन्सिंग, मास्क वापरणे यावर जोर देत आहेत, परंतु याशिवाय बचावाचे काही अन्य उपायही आहेत.

प्रतिष्ठित हेल्थ जर्नल द लँसेटमध्ये प्रकाशित एका संशोधनात म्हटले आहे की, शारीरीक अंतरासह मास्क आणि डोळ्यांची सुरक्षा संसर्गाचा धोका खुप कमी करते. संशोधकांनुसार, जागतिक आरोग्य संघटनेकडून सध्याच्या पुराव्यांचा व्यवस्थित आढावा घेण्यात आला आहे.

कॅनडाच्या मॅकमास्टर युनिव्हर्सिटीचे प्रोफेसर आणि या समिक्षेचे प्रमुख लेखक होल्गर शूनेमन यांनी म्हटले की, फिजिकल डिस्टन्सिंग म्हणजेच शारीरीक अंतराद्वारे कोरोनाची प्रकरणे कमी होणाची शक्यता आहे. शूनेमन डब्ल्यूएचओचे संसर्गजन्य अजाराचे, संशोधन पद्धतीचे आणि शिफारस समन्वय केंद्राचे सह संचालक सुद्धा आहेत.

प्रो. शूनेमन यांनी म्हटले की, दोन मीटर किंवा त्यापेक्षा जास्त शारीरीक अंतरासह चेहर्‍यावर मास्क किंवा फेस शील्ड आणि डोळयांची सुरक्षा बाळगल्यास कोरोना संसर्गाचा धोका कमी करता येईल. आरोग्य कर्मचारी जो मास्क घालतात, त्यांचा वापर दुसर्‍या आणि सामान्य मास्कच्या तुलनेत जास्त सुरक्षा देईल. मात्र, घरी तयार केलेले मास्कसुद्धा परिणामकारक आहेत. यासाठी कपड्याचे दोन किंवा तीन स्तर असावेत.

अनेक अभ्यासांच्या समग्र पुनरावलोकन दरम्यान, ही गोष्ट समोर आली आहे की, दोन मीटर किंवा त्यापेक्षा जास्त फिजिकल डिस्टन्सिंग कोरोना संसर्ग एका व्यक्तीकडून दुसरा व्यक्तीत पसरवण्यापासून वाचवू शकते. संशोधकांनी या गोष्टीवर जोर दिला की, डोळ्यांच्या सुरक्षेची काळजीसुद्धा घेतली पाहिजे. कारण काही शोधांमध्ये डोळ्यांद्वारे संसर्ग पसरण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.