पायाच्या वेदनादायी भोवरीची अशी काळजी घ्या

पोलीसनामा ऑनलाइन – भोवरी ही पायांच्या बोटांवर, बोटांच्या मध्यभागी किंवा तळपायाला होते. भोवरीला एखाद्या वस्तू स्पर्ष झाल्यास खूप वेदना होते. अनेकांना हा भोवरी किंवा फूट कॉर्नचा त्रास होतो. भोवरी झालेल्या ठिकाणी त्वचा जाड व मृत झाल्यासारखी असते. या ठिकाणी दबाव पडल्यास वेदना होतात.

घट्ट चपला घालणे, त्वचेवर दाब पडणे, त्वचेचे घर्षण होणे, पायात एखादी वस्तू टोचणे आदी मुळे भोवरीचा त्रास होतो. भोवरी ही पायांच्या बोटांवर, तळव्यांवर येऊ शकते. त्वचेवर दाब आणि घर्षणामुळे भोवरीची निर्मिती होते. भोवरी आल्यानंतर त्वचा संवेदनशील होते, त्वचेला फुगवटा येतो, त्याठिकाणी वेदना होतात. भोवरी ज्या ठिकाणी होते. त्याभागाची त्वचा जाड होणे, त्वचा संवेदनशील होते, त्वचेत वेदना होतात. व त्या ठिकाणी फुगवटा येतो. भोवरीची ही जाड त्वचा घरीच स्वत कापण्याचा प्रयत्न धोकादायक असते. यामुळे त्वचा कापली जाऊन इन्फेक्शन होण्याची भिती असते. भोवरीची लक्षणं दिसल्यास किंवा भोवरी आल्यास त्वचाविकार तज्ज्ञांना भेटावे. अथवा कॉर्न कॅप लावावी.

यामध्ये सॅलिफिलिक असिड असल्याने भोवरी बरी होण्यास मदत होते. तसेच आरामदायी चपला घालाव्यात. पायांच्या बोटांची चपलेत हालचाल व्हायला हवी. याशिवाय पायाच्या बोटांची नखेही वेळच्यावेळी कापली पाहिजेत. भोवरीचा त्रास होऊ नये यासाठी घट्ट चपला घालू नये, खूप वेळ उभं राहू नये, पायाच्या बोटांची नखे वेळच्यावेळी कापावीत, घरच्याघरी भोवरी कापण्याचा प्रयत्न करू नये. कोमट पाण्यात पाय बुडवून ठेवावेत. नंतर पाय स्वच्छ करून मॉईश्चरायझर लावावे. यामुळे भोवरी नरम पडेल. भोवरी झालेल्या ठिकाणी कॉर्न कॅप लावावी. भोवरी जास्त असल्यास त्वचाविकार तज्ज्ञांना दाखवणे योग्य ठरते.