How To Protect Smartphone | जर चोरीला गेला स्मार्टफोन तर ताबडतोब असा करा ब्लॉक, अन्यथा मिनिटात बँक अकाऊंट होऊ शकते रिकामे

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – How To Protect Smartphone | स्मार्टफोन (Smartphone) चोरीला गेला किंवा विसरला तर आपण खूप अस्वस्थ होतो. कारण स्मार्टफोनमध्ये अनेक महत्त्वाची कागदपत्रे आणि फोटो असतात, ज्याद्वारे लोक तुम्हाला ब्लॅकमेलही करू शकतात. यासोबतच स्मार्टफोन (Smartphone Importance) आज आपली गरज बनली आहे. (How To Protect Smartphone)

 

लोक स्मार्टफोनचा वापर केवळ मनोरंजनासाठीच करत नाहीत तर बँकिंगपासून ते सर्व वैयक्तिक कामांसाठीही करतात.

पण आता घाबरण्याची किंवा काळजी करण्याची गरज नाही. आता तुमचा स्मार्टफोन चोरीला गेल्यानंतरही तुम्ही सायबर गुन्हेगारांकडून होणारी फसवणूक (Cyber fraud) आणि ब्लॅकमेलिंगला (Blackmail) बळी पडण्यापासून वाचू शकता. (How To Protect Smartphone)

सायबर क्राईम टाळण्यासाठी सरकार घरबसल्या ऑनलाइन फोन ब्लॉक (स्मार्टफोन अनब्लॉक) ची सुविधा देत आहे. आता फोन ब्लॉक केल्यानंतर इतर कोणीही फोन वापरू शकणार नाही. तुमचा स्मार्टफोन रिकव्हर झाल्यास, ग्राहक त्याचा/तिचा स्मार्टफोन पुन्हा अनब्लॉक करू शकतो.

 

चोरीला गेलेला स्मार्टफोन असा करा ब्लॉक :

सर्वप्रथम CEIR च्या वेबसाइटवर जा.

येथे Block/lost mobile, check request status आणि Unblocked found mobile असे तीन पर्याय मिळतील.

फोन ब्लॉक करण्यासाठी Block/lost mobile पर्यायावर Click करा.

त्यानंतर एक पेज उघडेल, ज्यामध्ये मोबाईल डिटेल्स टाका.

मोबाईल Detail, IMEI नंबर, डिव्हाईस ब्रँड, कंपनीचे नाव, स्मार्टफोन Invoice, फोन हरवल्याची Date मोबाईल डिटेल म्हणून टाका.

पोलिस तक्रारीची प्रत अपलोड करा.

यानंतर नंबरवर एक OTP पाठवला जाईल. त्यानंतर पडताळणीची प्रक्रिया पूर्ण होईल.

फायनल सबमिट करून फोन ब्लॉक करू शकता.

 

Web Title :- How To Protect Smartphone | 5 steps protect your smartphone theft or loss

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा