पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी तुम्ही देखील ‘संवाद’ साधू शकता ; हे आहेत त्याचे ‘मार्ग’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशाच्या पंतप्रधानांशी बोलावं, आपल्या समस्या समक्ष त्यांना सांगाव्यात अशी सर्वसामान्य लोकांची इच्छा असते. आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांशी संवाद साधन्यासाठी ‘मन की बात’ उपक्रम राबवला आहे. तसंच मोदींपर्यंत काही पोहचवायचे असेल तर त्यासाठी फेसबुकवर किंवा ट्वीटरवर त्यांना टॅग करून पोहचवता येते. पण ते पाहतात का हे आपल्याला लवकर समजत नाही. परंतू याशिवायही आणखी काही मार्ग आहेत मोदींशी बोलण्याचे त्यांच्यापर्यंत कोणतीही गोष्ट पोहचवण्याचे.

ट्विटरवर मोदींपर्यंत काही पोहचवायचे असेल तर @PMOIndia किंवा @Narendramodi हे अकाऊंट टॅग करून लिहू शकता. तसंच इन्स्टाग्राम, आणि लिंक्डइनवरही मोदींशी संपर्क साधू शकता. इन्स्टाग्रामसाठी https://www.instagram.com/narendramodi/ ही लिंक आणि लिंक्डइनसाठी https://in.linkedin.com/in/narendramodi ही लिंक देण्यात आली आहे. यावर तुम्ही आपले म्हणणे मांडू शकता.

या सोशल मीडियाव्यतरिक्त पंतप्रधानांशी संवाद साधण्यासाठी एक अधिकृत पोर्टल डिझाईन करण्यात आले आहे. यावरही आपण आपल्या समस्या मांडू शकता. http://www.pmindia.gov.in/en/interact-with-honble-pm/ या लिंकवर लॉगइन करून एखादी गोष्ट पंतप्रधान कार्यालयापर्यंत पोहचवू शकता. तसंच तुम्ही http://www.mygov.in यावर जाऊनही तुमच्या सूचना नोंदवू शकता. तुमची एखादी कल्पना पंतप्रधान कार्यालयाने उचलून धरली तर ती देशाचं चित्र बदलण्यासाठीही उपयोगी पडू शकते.

तसंच रोजच्या वापरातील यू ट्यूबवरही मोदींशी संवाद साधता येऊ शकतो. Narendra modi’s Youtube Channel आहे. ते सबस्क्राइब करून त्यावरही तुमचा संदेश लिहू शकता. [email protected] या इ मेल च्या माध्यमातूनही तुम्ही पंतप्रधान कार्यालयापर्यंत पोहोचू शकता. तर NaMo अॅपही मोदींपर्यंत पोहचण्याचे उत्तम साधन आहे.

दरम्यान, सोशल मीडिया आहेच त्यानंतर अखेर पंतप्रधाननांपर्यंत पोहचण्यासाठी मार्ग म्हणजे त्यांना पत्र लिहीणे. त्यासाठीही पंतप्रधान, भारत सरकार, 7 रेसकोर्स रोड, नवी दिल्ली, असा पत्ताही देण्यात आला आहे.