पोलीसनामा ऑनलाईन टीम : आपल्या दैनंदिन जीवनाचा व्हाट्सअॅप एक महत्वपूर्ण भाग बनले आहे. वैयक्तिक जीवनाबरोबरच व्यावसायिक क्षेत्रासाठीदेखील व्हाट्सअॅप चा वापर केला जातो. अनेकवेळा महत्त्वपुर्ण माहितीची देवाणघेवाण होत असल्याने व्हाट्सअॅप ची सुरक्षितता महत्वपूर्ण ठरते. हे अॅप एकावेळी एकाच फोन वरून आणि एकाच मोबाईल क्रमांकावरून वापरता येते. मात्र सुरक्षेकडे दुर्लक्ष केल्यास आपलं व्हाट्सअॅप अकाऊंट आणि त्याबरोबर आपली गोपनीय माहिती चोरी होऊ शकते.
अशी होऊ शकते व्हाट्सअॅप अकाउंट ची चोरी :
एखाद्या व्यक्तीने तुमचा मोबाईल घेऊन त्यावर येणारा व्हाट्सअॅप लॉगिन साठी येणारा ओटीपी मिळवल्यास तो व्यक्ती त्या ओटीपी चा वापर करून तुमचे अकाउंट कोणत्याही मोबाईल वर उघडू शकतो. असे झाल्यास सर्वात आधी आपल्या जवळील लोकांना याची माहिती देणे गरजेचे आहे.
अशा प्रकारे चोरी झालेले अकाउंट करा रिकव्हर :
दुसऱ्या एखाद्या मोबाइल फोन वरून तुमचे अकाउंट साइन-इन करा. येथे नव्याने आलेला ओटीपी तुम्ही टाकल्यानंतर अन्य डिव्हाईस वरून तुमचे अकाउंट लॉग-आउट होइल आणि केवळ तुम्हीच त्याचा वापर करू शकता.
पासवर्ड सेट करा :
तुमच्या मोबाईल स्क्रीन बरोबरच व्हाट्सअॅपला देखील पासवर्ड ठेवा ज्यामुळे तुमचे व्हाट्सअॅप अधिक सुरक्षित राहील.
व्हाट्सअॅप वेब च्या माध्यमातून देखील चोरी होऊ शकते माहिती:
व्हाट्सअॅप च्या व्हाट्सअॅप वेब या ऑपशन च्या माध्यमातून क्यूआर कोड स्कॅन केल्यास तुमची माहिती मिळविली जाऊ शकते. त्यामुळे येथे जाऊन आपलं व्हाट्सअॅप वेब लॉग आउट करा. त्यामुळे तुमचे अकाउंट कोणाला कॉम्प्युटर वर वापरता येणार नाही.
टू-स्टेप व्हेरिफिकेशन चा प्रभावी वापर :
याव्यतिरिक्त सेटींग्समध्ये जाऊन टू-स्टेप व्हेरिफिकेशन एनेबल करा. याच्या माध्यमातून आपले व्हाट्सअॅप अकाउंट अधिक सुरक्षित राहील आणि त्रयस्थ व्यक्ती तुमची माहिती मिळवू शकणार नाही.
- व्यर्थ मानले जाणारे ‘हे’ रोप, स्त्री-पुरुषांच्या ‘या’ समस्यांवर रामबाण औषध
- महिलांच्या ‘मासिक’ चक्रासह कामेच्छाही ‘प्रभावित’ करतो ‘हा’ आजार, जाणून घ्या
- कॅन्सरपासून स्वत:ला दूर ठेवण्यासाठी लक्षात ठेवा ‘या’ ७ गोष्टी, जाणून घ्या
- ‘कफ’, ‘पित्त’ आणि ‘वात’ का वाढतो ? कसे टाळावे, जाणून घ्या उपाय
- मक्याचे कणीस खाण्याच्या खास पद्धती, ‘हे’ फायदे होतील, जाणून घ्या
- डोकेदुखीमध्ये करू शकता ‘हे’ ७ घरगुती उपाय, त्वरित मिळेल आराम
- ‘या’ धातूच्या भांड्यातील पदार्थ खाणे आरोग्यासाठी घातक; जाणून घ्या
- पौष्टिक तत्त्वे वाढवण्यासाठी भाज्या खाण्याच्या ७ सोप्या पद्धती, जाणून घ्या
- शुध्द तुपाचा ‘असा’ वापर केल्याने केस पांढरे होणार नाहीत, जाणून घ्या इतर १० फायदे
- ‘या’ १० गोष्टींमुळे भंग होते एकाग्रता, जाणून घ्या कोणती काळजी घ्यावी