Lockdown : Work From Home मुळे वाढतेय ‘ढेरी’, पोटाची ‘चरबी’ कमी करण्यासाठी ‘या’ 5 खास टीप्स, जाणून घ्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – सध्या राज्यात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. जीवनावश्यक गोष्टी सोडून इतर सर्व सेवा बंद करण्यात आल्या आहेत. त्यामुळे सरकारकडून लॉकडाऊन पुकारण्यात आला आहे. सध्या ऑफिसेस बंद असून कार्मचाऱ्यांना ‘वर्क फ्रॉम होम’ करण्यास सांगण्यात आले आहे. पण खरेतर घरी काम करणे ऑफिस मधून काम करणे यात मोठा फरक आहे. सध्या जादातर कामं ही लॅपटॉप किंवा कॉम्पुटर यांच्यावरच केली जातात. ऑफिसमध्ये आपण विशिष्ट उंचीचे टेबल, खुर्चीची सोय असते. आपण योग्य पद्धतीत बसून काम करतो. मात्र घरी तसं होत नाही, सहसा आपण आपल्या सोयीनुसार बसून काम करतो. शिवाय शरीराची हालचालही जास्त होत नाही. त्यामुळे पोट आणि कमरेभोवतालची चरबी वाढते.तुमचीही ढेरी अशीच वाढत असेल, तर ती कमी करण्यासाठी या टिप्स

१) सोल्युबल फायबर अधिक प्रमाणात घ्या

सोल्युबल फायबर calories शोषून घेतात. त्यामुळे ज्या पदार्थांमध्ये असे पदार्थ आहेत, अशा पदार्थांचा आहारात समावेश करा. डाळी, सफरचंद, लिंबूवर्गीय फळं यातून सोल्युबल फायबर मिळतं.

२) Transfat असलेले पदार्थ खाऊ नका

Transfat च्या अधिक सेवनाचा पोटाची चरबी वाढण्याशी संबंध असल्याचं काही संशोधनात दिसून आलं आहे.

३) मद्यपान कमी करा

जास्त प्रमाणात दारू प्यायल्याने belly fat वाढू शकतं. त्यामुळे पोट कमी करायचं असल्यास दारू कमी प्रमाणात प्या. शक्यतो करूच नका.

४) हाय प्रोटीनयुक्त आहार घ्या

पोट आणि कमरेभोवतालचा घेर कमी करण्यासाठी आहारातून जास्त प्रोटीन घ्या. मासे, डाळ यांचं सेवन करा.

५) पुरेसा व्यायाम करा

सध्या लॉकडाऊन मुळे आपल्याला बाहेर पडता येत नाही. त्यामुळे वॉकला जाणे किंवा जिमला जाणे शक्य होत नाही. अशा परिस्थितीत घरातच राहून आपण काही व्यायाम आणि योगासने करून फिट राहू शकतो. दिवसभर घरातुन काम करीत असताना एका जागेवर बसण्यापेक्षा काही अंतराने थोडीफार हालचाल करत राहा.