शरीरातील उष्णता वाढल्यास करा ‘हे’ 11 सोपे घरगुती उपाय

पोलीसनामा ऑनलाइन – अनेकांना शरीरात उष्णतेचं प्रमाण जास्त असल्यानं काही समस्या उद्भवतात. डोळ्यांची आग, छातीत जळजळ, अंगावर उष्णतेचे फोड अशा समस्या येतात. शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी आज आपण काही घरगुती उपाय जाणून घेणार आहोत.

1) मनुका – हा सर्वोत्तम उपाय आहे. यासाठी रोज रात्री 100 ग्रॅम मनुके कोमट पाण्यात भिजवावेत. सकाळी उठल्यानंतर हे मनुके चावून घ्यावे आणि त्या पाण्याचंही सेवन करावं.

2) ताक – रोज दुपारी जेवणानंतर ताक प्यावं. रात्री कधीही ताकाचं सेवन करू नये.

3) जिरे – जिरे अत्यंत थंड आहे. रात्री एक कप पाण्यात अर्धा चमचा जिरे टाकावे. सकाळी या पाण्याचं सेवन करावं. यामुळं शरीराला थंडावा मिळतो. यामुळं वजनदेखील नियंत्रणात राहतं.

4) सब्जा – रात्री सब्जा काचेच्या भांड्यात भिजत घालून सकाळी खडीसाखर घालून उपाशीपोटी प्यावं.

5) सकस आहार – कायम सकस आहार घ्यावा. सकाळी आणि दुपारचे जेवण वेळेत आणि लवकर करावे.

6) पाणीदार फळं – पाणीदार फळांचं सेवन करावं. ताडगोळे, द्राक्ष, डाळींब या फळांचं सेवन करावं.

7) पाण्याचं जास्त सेवन – भरपूर पाणी प्यावं. माठातील पाण्यावर जास्त भर द्यावा. फ्रीजमधील थंड पाणी पिणं शक्यतो टाळावं.

8) स्वयंपाक – स्वयांपाकात जिऱ्याचा वापर वाढवावा

9) लिंबाचा सरबत – लिंबाचा सरबत प्यावा. यामुळं शरीरातील पाण्याची पातळी भरून निघते.

10 पुदीना – जेवताना पुदीन्याचा जास्त वापर करावा. याची चटणी करूनही आहारात समाविष्ट करू शकता.

11) कोकम सरबत – जर कधी स्पायसी किंवा जंक फूड खाल्लं किंवा जास्त मसालेदार पदार्थ खाल्ले तर थोड्या वेळानं लगेच कोकम सरबत प्यावा.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like