How To Reduce Uric Acid | काही दिवस चावून खा ‘ही’ 3 प्रकारची पाने, रक्तात जमा झालेले यूरिक अ‍ॅसिड पडेल बाहेर

पोलीसनामा ऑनलाइन टीम – How To Reduce Uric Acid | युरिक अ‍ॅसिड हा रक्तामध्ये आढळणारा घाणेरडा पदार्थ आहे. जेव्हा शरीर प्युरिन (Purine) नावाचे रसायन विघटीत करते तेव्हा ते तयार होते. बहुतांश युरिक अ‍ॅसिड रक्तात विरघळते, मूत्रपिंडातून (kidney) लघवीद्वारे (Urine) शरीराबाहेर जाते. प्युरीन समृध्द अन्न आणि पेये देखील रक्तातील यूरिक अ‍ॅसिडची पातळी वाढवतात. (How To Reduce Uric Acid)

 

रक्तात याचे प्रमाण वाढल्याने गाउट रोग होऊ शकतो. गाउट हा एक प्रकारचा संधिवात आहे. ज्यामध्ये सांध्यामध्ये तीव्र वेदना होतात. शरीरात यूरिक अ‍ॅसिडचे प्रमाण जास्त असल्यास हायपरयुरिसेमिया होऊ शकतो.

 

ही अशी स्थिती आहे ज्यामध्ये यूरिक अ‍ॅसिडचे ’क्रिस्टल्स’ तयार होऊ शकतात. हे क्रिस्टल्स सांध्यामध्ये जमा होऊन संधिवात होऊ शकतो. इतकंच नाही तर त्यामुळे किडनी स्टोन होऊ शकतो. (How To Reduce Uric Acid)

 

उपचार न केल्यास हाय यूरिक अ‍ॅसिडची पातळी (High Uric Acid Levels) हाडे, सांधे आणि ऊतींना इजा करू शकते. एवढेच नाही तर किडनीचे आजार आणि हृदयविकारही (Heart Disease) होऊ शकतो. यावर अनेक उपचार आहेत, परंतु काही घरगुती उपायांनीही तुम्ही यापासून आराम मिळवू शकता.

 

1. युरिक अ‍ॅसिड साठी रामबाण उपाय – कोथिंबीर (Coriander)
कोथिंबीरीची हिरवी पाने जेवणाची चव तर वाढवतातच शिवाय अनेक गंभीर आजारांवर उपचार करतात. कोथिंबिरीला आयुर्वेदात महत्त्वाचे स्थान आहे. रक्तातील क्रिएटिन आणि युरिक अ‍ॅसिडची पातळी कमी करण्यासाठी तुम्ही कोथिंबीरच्या पानांचा वापर करू शकता.

 

कोथेंबिर फायबर, लोह, मँगनीज आणि मॅग्नेशियमचा (Fiber, Iron, Manganese, Magnesium) चांगला स्रोत आहे. प्रोटीन व्यतिरिक्त, पानांमध्ये व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन के (Vitamin C, Vitamin K) असते. त्यात कॅल्शियम, पोटॅशियम, थायामिन, फॉस्फरस आणि नियासिन (Calcium, Potassium, Thiamin, Phosphorus, Niacin) सारखी खनिजे देखील आढळतात.

कोथेंबिर कशी वापरावी
कोथिंबीरीची जुडी घ्या, पाने चांगली धुवा. यानंतर अर्धा तास पाने मिठाच्या पाण्यात बुडवून ठेवा. मुळे कापून दोन ग्लास पाण्यात बंद भांड्यात 10 मिनिटे उकळवा. झाकण न काढता थंड होऊ द्या. रिकाम्या पोटी या द्रवाचे सेवन करा.

 

2. युरिक अ‍ॅसिड कमी करण्यासाठी तमालपत्र प्रभावी
तमालपत्राचा (Bay leaf) वापर स्वयंपाकघरात मसाला म्हणून केला जातो.
एका अभ्यासानुसार, हे केवळ जेवणाची चवच वाढवत नाही तर युरिक अ‍ॅसिड कमी करू शकणारा हर्बल उपाय देखील आहे.

 

यामध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए (Vitamin A) आणि फॉलिक अ‍ॅसिड असते जे शरीराच्या आरोग्यासाठी चांगले असते.
हाय यूरिक अ‍ॅसिड कमी करण्यासाठी तमालपत्र प्रभावी मानले जाते.

 

तमालपत्र कसे वापरावे
10-15 तमालपत्र घ्या आणि तीन ग्लास पाणी घ्या. ते स्वच्छ होईपर्यंत तुम्ही वाहत्या पाण्याने तमालपत्र धुवा.
तमालपत्र उकळत्या पाण्यात उकळा. दिवसातून दोनदा उकळलेले पाणी प्या.

Advt.

3. खायची पाने
खाण्याची हिरवी पाने देखील युरिक अ‍ॅसिडची पातळी कमी करण्यास मदत करतात.
एका अभ्यासानुसार, संशोधनादरम्यान ज्या उंदरांना खाण्याच्या पानांचा अर्क देण्यात आला होता
त्यांची यूरिक अ‍ॅसिड पातळी 8.09mg/dl वरून 2.02mg/dl झाली.

यासाठी तुम्ही खाण्याची पाने खावू शकता पण त्यासोबत कोणत्याही प्रकारचा तंबाखू वापर करू नका.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- How To Reduce Uric Acid | according to different research chew 3 types of leaf to reduce uric acid level in blood and get rid gout marathi news

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Men Health Tips | पुरुषांनी जरूर करावे गुळवेलचे सेवन, ‘या’ समस्यांपासून होईल सुटका

 

White Hair | सकाळी-सकाळी करा ‘या’ गोष्टींचा 5 प्रकारे वापर, केस पांढरे होण्याच्या समस्येपासून होईल सुटका

 

Deccan Education Society (DES) | डीईएसच्या 3500 विद्यार्थ्यांचे सामूहिक राष्ट्रगीत