SBI च्या ग्राहकांनी ‘मोबाईल नं.’ आणि ‘ई-मेल’ आयडी खात्याशी सलग्न केल्यास मिळणार ‘या’ 3 गोष्टींची तात्काळ माहिती, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम – देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या SBI ने आपल्या ग्राहकांसाठी Email द्वारे माहिती मिळवण्याच्या ऑनलाइन सेवेची माहिती उपलब्ध करुन दिली आहे. या सेवेचा सर्व ग्राहक फायदा घेऊ शकतात आणि बँक खात्यासंबंधित माहिती जाणून घेऊ शकतात. यासाठी तुम्हाला तुमचा मोबाइल नंबर बँक खात्याला जोडावा लागेल. याशिवाय बँक तुम्हाला विविध योजनेसंबंधित माहिती पुरवेल.

SBI ने सांगितले की, बँक खात्याला मोबाइल नंबर आणि ई-मेल ID जोडल्याने तुम्हाला ओटीपी, पिन एक्टिवेशनशी संबंधित मेसेज सहज मिळतील. याशिवाय तुम्हाला बँक खात्याशी संबंधित माहिती देखील मिळेल.

मोबाइल नंबर बँक खात्याला जोडा –
1. यासाठी तुम्हाला www.onlinesbi.com वर लॉग इन करावे लागेल.
2. यानंतर माय अकाऊंट या टॅबवर किल्क करा.
3. यानंतर पर्सनल डिटेल्स/मोबाईलवर क्लिक करा.
4. तुम्हाला यासाठी पासवर्ड तयार करावा लागेल. प्रोफाइल पासवर्ड आणि लॉन इन पासवर्ड वेगवेगळे आहेत.
5. यानंतर तुम्हाला तुमचा मोबाइल नंबर आणि ई-मेल आयडी टाकावा लागेल.

इंटरनेट बँकिंगची सुविधा नसताना देखील तुम्ही मोबाइल नंबर अपडेट करु शकतात
1.
एटीएमच्या माध्यमातून मोबाइल नंबर अपडेट करण्यासाठी जवळच्या एसबीआय एटीएममध्ये जा.
2. रजिस्ट्रेशनच्या पर्यायावर क्लिक करा आणि एटीएम पिन टाका.
3. मोबाइल नंबर चेंजचा पर्याय निवडा आणि जुना मोबाइल नंबर टाकून नवीन मोबाइल नंबर टाका आणि अपडेट करा.
4. एक OTP मेसेज येईल. यानंतर मेसेजच्या माध्यामातून सुरु होणाऱ्या छोट्याशा प्रक्रियेनंतर मोबाइल नंबर अपडेट होईल.

आरोग्यविषयक वृत्त