मोबाईलमधून ‘फालतू’ Apps ला कसे हटवावे ? जाणून घ्या फोन हॅंग होण्याच्या समस्येपासून कसे वाचावे ?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आजकाल आपण प्रत्येक गोष्टीसाठी स्मार्टफोनचा वापर करतो. शॉपिंग करायची असेल, काही बँकेचे काम असेल किंवा इतर कोणतीही महत्त्वाची कामे असेल तरी आपण स्मार्टफोनचा वापर करतो. मात्र जास्त अ‍ॅप्स डाऊनलोड केल्यामुळे बर्‍याच वेळा फोन हँग होतो. फोनमध्ये जागेचा अभाव आणि रॅमवरील प्रेशरमुळे फोन खूप स्लो होतो. आपल्या फोनमध्ये जर स्टोरेज कमी असल्यास आणि रॅम 1 जीबीपेक्षा कमी असल्यास मोबाईलमध्ये समस्या येण्यास सुरुवात होते. त्याशिवाय प्रत्येक फोनमध्ये काही अ‍ॅप्स येतात ज्याचा आपल्याला उपयोग होत नाही आणि अशा अ‍ॅप्स फोनवरून अनइन्स्टॉल होत नाहीत ज्यामुळे फोन हँग होण्यास सुरवात होते. या व्यतिरिक्त, आपण फोनवरून गेम आणि न वापरलेले अ‍ॅप्स इन्स्टॉल करणे टाळावे. आज आम्ही तुम्हाला मोबाईलमधून असे अनावश्यक अ‍ॅप्स हटविण्याचा सोपा मार्ग सांगणार आहोत. ज्यामुळे आपल्या फोनची बॅटरी बर्‍याच दिवस चालेल. यासह, फोन जास्त दिवस चांगला राहिल.

1. सगळ्यात पहिले आपल्या फोनमधून Game app आणि कमी उपयोग होत असलेले अ‍ॅप्सला डिलिट करुन टाका.

2. आपल्या मोबाईलमध्ये फक्त आवश्यक असलेले अ‍ॅप्स ठेवा. गूगल प्ले, गुगल सेटिंग, अँड्रॉइड सिस्टम सारखे अ‍ॅप्स हटवू नका, यामुळे आपला फोन पूर्णपणे बंद होऊ शकतो.

3- फोनला रूट करा आणि आता फोनमध्ये सुपरजर अ‍ॅप डाउनलोड करा.

4 – आता हे अ‍ॅप उघडा, त्यामध्ये तुम्हाला वरच्या मध्यभागी डिलीट करण्याचा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा.

5- आता आपल्याला system application वर क्लिक करावे लागेल.

6- येथे आपल्याला मोबाईलचे सर्व सिस्टम अॅप दिसेल. आपल्याला जे app delete करायचे असेल तर delete icon वर क्लिक करा.

7- येथे आपण एक warning दिसेल. removing system apps may Cause system instability and other problems आता आपल्याला yes वर क्लिक करावे लागेल.

8- आता आपल्या फोनमध्ये कधीही फालतू अ‍ॅप्स येणार नाहीत.