Coronavirus : ‘या’ सोप्या पध्दतीनं आपल्या घराला करा ‘सॅनेटाईज’, ‘कोरोना’चा धोका नाही राहणार

पोलिसनामा ऑनलाईन – कोरोना व्हायरसपासून बचाव करण्यासाठी सगळीकडे लॉकडाऊन केले जात आहे, पण घरात साफसफाई नसेल तरीही व्हायरसचा धोका निर्माण होऊ शकतो. यासाठी ज्या गोष्टींना आपण रोज स्पर्श करतो त्यांना स्वच्छ ठेवणे गरजेचे आहे. घराचे दरवाजे, हॅण्डल, फरशी, खुर्ची, टेबल, सिंक, कॅबिनेट हॅण्डल, फ्रिजसह मोबाइल, कॉम्पुटर, टीव्हीचा रिमोट इत्यादी सगळ्या वस्तू साफ ठेवणे गरजेचे आहे, कारण याला सगळ्यांचे हात लागतात. यासाठी कोणत्याही महागड्या केमिकल्सचा गरज नाही तर घरातच होम सॅनिटायझर बनवू शकता किंवा बाजारात मिळणाऱ्या केमिकलयुक्त सॅनिटायझरचा वापर करू शकता.

अशा प्रकारे करा घराची साफसफाई –

कार्बोलिक ऍसिडने करा साफ
फर्निचर, दरवाजे, खिडकी इत्यादी कार्बोलिक ऍसिडने सॅनिटाईझ करा. या ऍसिडमध्ये तीन वेळा पाणी टाका. जिथेही हात पडेल ती जागा याने साफ करा किंवा याचा स्प्रे करून शिंपडा.

दिवसातून दोन वेळा करा सॅनिटाईझ
घरात ज्या जागांना सर्वात जास्त हात लागतो त्या जागा दोन वेळा सॅनिटाईझ करा. घराचे दरवाजे, कॅबिनेट हॅण्डल, सिंक, टेबल-खुर्चीसह इलेक्ट्रॉनिक डिव्हाईसला अल्कोहोलयुक्त सॅनिटायझरने साफ करा. यासाठी तुम्ही सॅनिटायझरचा स्प्रे मारल्यावर ते पुसा. नंतर अल्कोहोलयुक्त सॅनिटायझर शिंपडून सुकू द्या.

किटाणूनाशक स्प्रेचा वापर करा
सोफा, कार्पेट, उशी, चादर इत्यादींच्या साफसफाईसाठी कोणत्याही किटाणूनाशक स्प्रेचा वापर करू शकता. टेबल, काउंटरटॉप्स, सिंक किंवा हॅण्डलवर तुम्ही याला टॉवेल पेपरवर टाकून पुसून शकता.

फरशी साफ करण्यासाठी ब्लिच मिश्रणाचा वापर
चप्पलांपासून येणाऱ्या व्हायरस किंवा किटाणूंना साफ करण्यासाठी फरशीची सफाई ब्लिचने करा. बाथरूम, स्टोअर, किचनमध्येही तुम्ही याचा वापर करू शकता.

लाकडी वस्तूंना असे करा किटाणूमुक्त
लाकडी वस्तूंवर पाणी टाकल्याने त्या वस्तू खराब होत असतील तर एका निर्जंतुक कापडाला पांढऱ्या व्हिनेगरच्या पाच लिटर पाण्यामध्ये भिजवून घ्या.

हायड्रोजन पॅरॉक्साइडने करा साफ
हायड्रोजन पॅरॉक्साइड केवळ दात साफ करण्यासाठी नसून त्यात असलेले ३ टक्के हायड्रोजन पॅरॉक्साइड आठ मिनिटात व्हायरसला नष्ट करण्यास सक्षम आहे. आपल्या सिंक, काउंटरटॉप्स किंवा टॉयलेट्सवर याला १० ते १५ मिनिटे शिंपडून द्या. याने विषाणू मरतील.

कार्बोलिक ऍसिड और सोडियम हायपो क्लोराइडने
कार्बोलिक ऍसिड और सोडियम हायपो क्लोराइडनेही घराला सॅनिटाईझ केले जाऊ शकते. हे केमिकल सर्जिकल आयटमच्या दुकानात उपलब्ध असून याची किंमत फिनायल एवढी असते. यामुळे जवळजवळ संपूर्ण दिवस स्वच्छता होते.

सोडियम हायपो क्लोराइडने
घराच्या फरश्या सॅनिटाईझ करण्यासाठी सोडियम हायपो क्लोराइडने पुसून घ्या. याच्या प्रमाणापेक्षा जास्त पाणी घ्या. एक ग्लास केमिकल असेल तर चार ग्लास पाणी असले पाहिजे.

जंतुनाशक स्प्रे असलेले होममेड ब्लीच
४ चमचे होममेड ब्लिच आणि १/४ पाणी घ्या. दोन्ही एका स्प्रे बाटलीत भरा आणि जोरात हलवा. आता ब्लिचयुक्त किटाणूनाशक स्प्रे तयार झाला. आता जिथे पण साफ करायचे आहे तिथे हा स्प्रे मारून १० मिनिटांनंतर ओल्या कपड्याने पुसून घ्या.

इलेक्ट्रानिक वस्तूंची सफाई
कोणत्याही इलेक्ट्रॉनिक उपकरणासाठी आयसोप्रोपाइल अल्कोहोल सॅनिटायझरचा वापर करा.