तुमच्या फोनमध्ये लपलेला असून शकतो कोरोना व्हायरस ! जाणून घ्या मोबाइल सॅनिटाइज करण्याच्या 3 बेस्ट पध्दती

पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना विषाणू लोकांवर लवकर प्रभावी ठरत आहे. अशा परिस्थितीत प्रत्येकाने काळजी घेणे आवश्यक आहे. विशेषतः त्यांनी जे लोक घराबाहेर जातात. वारंवार आपले हात सॅनिटायझरने साफ करत रहा. घरी येताच तुमचा फोन चांगल्या पद्धतीने स्वच्छ करा. असे करताना आपण काळजी घेणे आवश्यक आहे. तुम्हाला हे माहिती आहे का की फोन चुकीच्या पद्धतीने साफ केल्याने तुमचा फोन खराब होऊ शकतो ?

महत्वाची गोष्ट अशी की ज्या सॅनिटायझरने तुम्ही तुमचे हात स्वच्छ करता, जर त्याद्वारे फोन साफ केल्यास तुमचा फोन खराब होऊ शकतो. तुमच्या फोनवर स्पॉट्स येऊ शकतात आणि शॉर्ट सर्किट होऊ शकते. आज आम्ही तुम्हाला फोन साफ करण्याचा सोपा मार्ग सांगणार आहोत. या टिप्स तुम्ही लक्षात घेऊन तुम्ही तुमचा मोबाईल व्हायरस मुक्त करू शकता.

वाइप्सचा वापर करा:
जर तुम्ही घराबाहेर जात असाल तर मोबाईल साफ करण्याचा सोपा मार्ग म्हणजे बाजारात मिळणारे ७०% अल्कोहोल असणारे मेडिकेटेड वाइप्स. या वाइप्सने तुम्ही तुमचा फोन सहज साफ करू शकता. वाइप्सद्वारे फोनचे कोपरे, मागील बाजू चांगल्या प्रकारे साफ करू शकता. त्यामुळे फोनवरील बॅक्टेरिया निघून जातील आणि फोन खराब होणार नाही.

कॉटनचा वापर:
जर तुम्हाला सॅनिटायझरने मोबाईल स्वच्छ करायचा असेल तर प्रथम फोन बंद करा. आता कापसाचा तुकडा घ्या आणि त्यावर थोडेसे सॅनिटायझर लावा. आता फोनची स्क्रीन स्वच्छ करा. हे लक्षात ठेवा की कापसावर रबिंग अल्कोहोलचे प्रमाण कमी असले पाहिजे. याशिवाय फोन स्वच्छ करण्याचा सोपा मार्ग कस्टमर केयरला फोन करून तुम्ही जाणून घेऊ शकता. वेगवेगळ्या फोन कंपन्यांच्या फोनचे मटेरियल आणि डिस्प्ले वेगवेगळे असतात.

अँटी बॅक्टेरियल पेपर:
मोबाईल स्वच्छ करण्याचा एक सुरक्षित उपाय म्हणजे बॅक्टरीयल टिशू पेपर. तुम्ही कोणत्याही मेडिकल स्टोर मध्ये हे खरेदी करू शकता. या पेपरद्वारे तुम्ही तुमचा मोबाईल फोन साफ करू शकता. हे वाइप्स कोरडे असतात, त्यामुळे मोबाईलचे कोणतेही नुकसान होत नाही.