WhatsApp वरून कॉल करत असाल तर वापरा ‘ही’ ट्रिक, कमी खर्च होईल डाटा

पोलीसनामा ऑनलाइन टीम –  सध्या WhatsApp चा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. बहुतांश युजर्स WhatsApp वापरासाठी इंटरनेटचा वापर करतात. पण जेव्हा आपण Voice/Video Call करतो तेव्हा मात्र काही प्रमाणात डाटाचा वापर होतो. पण आता जर तुम्हाला कमी डाटामध्ये WhatsApp वापरायचं असेल तर काही ट्रिक आहेत. त्या वापरल्यास नक्की फायदा होऊ शकतो.

जगातील सर्वात जास्त वापर असणाऱ्या इन्स्टंट मॅसेजिंग ऍप WhatsApp वर फोन, मेसेजचा पर्याय मिळतो. याशिवाय इंटरनॅशनल कॉलचा पर्यायही मिळतो. त्यामुळे डाटाचा वापर मोठ्या प्रमाणात होतो. पण आता डाटाची बचत करता येऊ शकते. मात्र, या पर्यायाच्या माध्यमातून क्वालिटीमध्ये थोडा फरक पडू शकतो.

असा बचत करा मोबाईल डाटा

– WhatsApp सेटिंगवर क्लिक करा

– त्यानंतर Data and Storage या पर्यायावर क्लिक करा

– Call Setting वर जाऊन डाटा युसेज On करा

असाही वाचवा डाटा

WhatsApp फोटो, व्हिडिओ, ऑडिओ आणि दुसऱ्या डॉक्युमेंट्सच्या स्टोरेजमुळे डाटाचा वापर मोठ्या प्रमाणात होतो. जर तुम्हाला हा डाटा वाचवायचा असल्यास सेंटिग्जमध्ये बदल करावा लागेल. या सेटिंग्जनंतर चॅट्समधून येणाऱ्या मीडिया फाईल्स ऑटो डाऊनलोडही होणार नाही आणि तुमचा इंटरनेट डाटाही वाचेल.