नक्की वाचा : ‘या’ पध्दतीनं मोबाईलमधील इंटरनेटचा ‘डेटा’ वाचवा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – आपल्यापुढे कायमच एक समस्या असते की मोबाइलचा इंटरनेट डाटा कसा वाचवावा. कारण इंटरनेटचा होणारा वापर आज खूपच जास्त आहे, त्या तुलनेत कंपन्यांकडून मिळणारा इंटरनेट डाटा पुरेसा नाही. परंतू तुम्ही मोबाइल इंटरनेटचा डाटा वाचवू शकतात आणि तुमचा होणारा खर्च टाळू शकतात. मोबाइलमधील इंटरनेट डाटा वाचवण्यासाठी काही उपाय देखील आहेत.

ट्रॅंगल अ‍ॅप
या अ‍ॅपची सध्या टेस्टिंग सुरु आहे. या अ‍ॅप द्वारे तुम्ही तुमचा मोबाइल डाटा वाचवू शकतात. त्यासाठी या काही सोल्यूशन असणार आहे. आपल्या नकळत अनेक अ‍ॅप आपल्या मोबाइलमध्ये येत असतात जे आपल्याला माहिती देखील नसतात. हे सर्व अ‍ॅप ब्लॉक करण्याची सोय या अ‍ॅपमध्ये आहे.

या अ‍ॅपमध्ये तुम्ही काही अ‍ॅप 10 ते 15 मिनिट सुरु ठेवण्याची परवानगी तुम्ही देऊ शकतात. यात डेटा बॅलन्स आणि वापरलेला डाटा अशी माहिती तुम्हाला स्क्रीनवर दिसेल. सध्या हे अ‍ॅप गुगल प्ले स्टोअर आहे. परंतू ते अजून डाऊनलोड करता येत नाही.

रिस्ट्रिक बॅकग्राऊंड डेटा
काहीही काम न करता अनेकदा इंटरनेट डाटा संपतो. हे रोखण्यासाठी हे अ‍ॅप तुम्हाला मदत करेल. या सेटिंगमध्ये अ‍ॅप किती डाटा वापरतो याची माहिती मिळते. अ‍ॅप सुरु केल्यावर खालील बाजूस असलेल्या रिस्ट्रिक बॅकग्राऊंड डेटा या पर्यायावर क्लिक करावे ज्यामुळे अ‍ॅप बंद असताना जो डाटा वाया जातो तो खर्च होणार नाही.

ऑटो अपडेटिंग अ‍ॅ
अनेकदा अ‍ॅप अपडेशनमुळे खूप जास्त डाटा खर्च होतो. अनेक वापरकर्ते प्ले स्टोअरमध्ये ‘सेट टू ऑटो अपडेट्स अ‍ॅप्स’ हा पर्याय निवडतात. त्यामुळे नवे व्हर्जन आल्यानंतर लगेचच हे अ‍ॅप अपडेट होत जातात. त्यात यूजर्सचा सर्वाधिक डाटा वाया जातो. त्यामुळे यूजर्सने गुगल प्ले स्टोअरच्या सेटिंगमध्ये जाऊन ‘डू नॉट ऑटो अपडेट’ हा पर्याय निवडून ‘ओन्ली वाय – फाय अपडेट ‘हा पर्याय निवडावा. ज्यामुळे अ‍ॅप आपोआप अपडेट होणार नाही.काही ठाराविकच अ‍ॅप तुम्हाला ऑटो अ‍पडेट ठेवायचे असतील तर प्रत्येक अ‍ॅपच्या सेटिंग्समध्ये ‘डू नॉट ऑटो अ‍ॅप’ पर्याय निवडावा.

Visit : policenama.com