WhatsApp स्टेटस सेव्ह करण्यासाठी स्क्रीनशॉटची गरज नाही … जाणून घ्या ट्रिक्स

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सोशल नेट्वर्किंग साईट्स पैकी सर्वाधिक लोकप्रिय सोशल नेट्वर्किंग साईटस म्हणजे व्हॉट्सॲप. व्हॉट्सॲपने आपल्या ग्राहकांकरिता नेहमी नवनवीन काहीतरी देण्याचा प्रयत्न केला आहे. व्हॉट्सअ‍ॅपने मागील वर्षी स्टेट्स फीचर लाँच केले होते. या फीचरचा वापर युजर्सकडून मोठ्या प्रमाणावर सुरू आहे.

मात्र स्टेट्स फीचर सेव्ह करण्यासाठी कोणताही ऑप्शन नाही. स्टेट्स फीचर सेव्ह करण्यासाठी स्क्रीनशॉट काढावा लागतो. मात्र हे स्क्रीनशॉट न काढता स्टेटस सेव्ह करता येणार आहे. त्यासाठी सेव्हर अ‍ॅप डाऊनलोड करावे लागेल. तसेच अ‍ॅपच्या मदतीशिवायही व्हॉट्सअ‍ॅप स्टेटस सेव्ह करता येते. त्यासाठी युजर्सना स्मार्टफोनमधील फाईल मॅनेजरमध्ये सेटिंग करावी लागेल.

असे करा स्टेटस सेव्ह –

१) अ‍ॅपच्या मदतीने –

गुगल प्ले स्टोरवरून सर्वप्रथम सेव्हर अ‍ॅप डाऊनलोड करा.
व्हॉट्सअ‍ॅपच्या स्टेटस पेजवर जाऊन यूजरनेमवर टॅप करा.
फोनमधील स्टेटस सेव्हर ओपन करा. हे अ‍ॅप स्टेटसचा डिस्प्ले स्कॅन करेल.
यानंतर व्हिडीओ आणि फोटोंचा एक ऑप्शन दिसेल. त्यापैकी तुम्हाला हवा असलेला ऑप्शनवर क्लीक करा.
अ‍ॅपमध्ये स्टेटसच्या बाजूला युजर्सना डाऊनलोडचा पर्याय दिसेल.
डाऊनलोड पर्यायावर क्लिक केल्यास स्टेटस तुमच्या स्मार्टफोनमध्ये सेव्ह होईल.

२ ) सेटींग्सच्या मदतीने –

सर्वप्रथम स्मार्टफोनमध्ये फाईल मॅनेजर ओपन करा.
फोनच्या इंटरनल स्टोरेजमध्ये जाऊन सेटींग्सवर क्लिक करा.
शो हिडन फाईल्सचा पर्याय दिसेल. तो पर्याय इनेबल करा.
इंटरनल स्टोरेजमध्ये व्हॉट्सअ‍ॅप फोल्डरमध्ये जा. तेथील मीडिया पर्यायावर क्लिक करा.
फोल्डरमध्ये ‘Statuses’ चा एक पर्याय मिळेल. त्यावर क्लिक केल्यास तिथे युजर्सना सर्व व्हॉट्सअ‍ॅप स्टेटस मिळतील.