कामाची गोष्ट ! WhatsApp ‘हॅक’ होण्यापासून वाचविण्यासाठी त्वरित बदला ‘ही’ Setting, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सध्या व्हॉट्सअ‍ॅप हॅक झाल्याच्या बातम्यांमधून सुरक्षेची भीती व्यक्त केली जात आहे. अशा परिस्थितीत जर तुम्हाला तुमचे व्हॉट्सअ‍ॅप सुरक्षित ठेवायचे असेल तर आपल्याला व्हॉट्सअ‍ॅपच्या सेटिंग्जमध्ये काही खास बदल करण्याची आवश्यकता आहे.

यासाठी सर्व प्रथम, आपल्या फोनचे व्हॉट्सअ‍ॅप उघडा. यानंतर, सेटिंग्ज वर क्लिक करा, त्यानंतर अकाउंटवर क्लिक करा. आता आपल्याला टू-स्टेप व्हेरिफिकेशनचा पर्याय दिसेल. यावर क्लिक करुन ते अनेबल करावे लागेल.

यावरून आपण 6-अंकी पिन क्रिएट करु शकता. याचा फायदा असा आहे की, व्हॉट्सअ‍ॅप सेट अप करताना कोणत्याही नवीन फोनला या पिनची आवश्यकता असेल.

टू-स्टेप व्हेरिफिकेशन कोडद्वारे पिन तयार केल्यानंतर आपल्यास ईमेल लिंक करण्याचा पर्याय असेल. आपण आपला पिन कधीही विसरल्यास, व्हॉट्सअ‍ॅप आपल्या मेलवर एक लिंक पाठवू शकते.