फोन हरवला तरी तुमचं Whatsapp चॅट ठेवा सुरक्षित, ‘या’ सोप्या स्टेप्स करा फॉलो 

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – सोशल नेटवर्किंग साईटस पैकी व्हॉट्सअ‍ॅप च्या लोकप्रियतेने शिखर गाठले आहे. तरुणाईमध्ये हे अ‍ॅप सर्वाधिक प्रमाणात वापरले जाते. पण तुमच्या  व्हॉट्सअ‍ॅप मधील तुमचे खाजगी मेसेजेस किंवा चॅट हे तिसऱ्या कुणी व्यक्तीने वाचायला नको ते खाजगीच राहावे याकरिता सर्वजण प्रयत्न करीत असतो पण समजा तुमचा फोन चॊरीला गेला आणि तेव्हा तुमचे खासगी चॅट किंवा व्हॉट्सअ‍ॅप  मेसेजेस कुणीही पाहू शकतो. याचा कुणीही गैरफायदा घेऊ शकतो. अशा वेळी नक्की कोणती खबरदारी घेतली पाहिजे हे पाहूया..

तुमचा फोन हरवला तर त्वरित या गोष्टी करा

— जर तुमचा फोन हरवला असले तर सर्वात आधी तुम्ही तुमचं सिम कार्ड ब्लॉक करा. तुमच्या मोबाईल सर्व्हिस प्रोव्हायडरला फोन करुन तुम्ही सिम कार्ड ब्लॉक करु शकता. यामुळं तुमचं व्हॉट्सअ‍ॅप अकाउंट कोणी चालु करू शकणार नाही.
— सिम कार्ड ब्लॉक केल्यानंतर त्याच नंबरवर तुम्ही नवीन सिम कार्ड घेऊ शकता. त्यामुळे त्याच नंबरवर तुमचं व्हॉट्सअ‍ॅप अ‍ॅक्टिव्हेट होईल. पण व्हॉट्सअ‍ॅप एकाच नंबर वरुन अ‍ॅक्टिव्हेट होऊ शकते.
–जर तुम्हाला नवीन सिम घेऊन सिमकार्ड अ‍ॅक्टिव्हेट करायचे नसल्यास, [email protected] यावर तुम्ही मेल पाठवू शकता. या मेलवर आपला नंबर लिहून मेल बॉडीवर “Lost/Stolen: Please deactivate my account” असे लिहून मेल पाठवू शकता. असे केल्यानंतर आपोआप तुमचा नंबर डि अ‍ॅक्टिव्हेट होईल.

–तुमचे अकाउंट डिअ‍ॅक्टिव्हेट झाल्यानंतरही ३० दिवसांपर्यंत तुम्हाला तुमच्या कॉन्टॅक्ट लिस्टमधले लोक मेसेज करु शकतात. जर तुम्ही तुमचे व्हॉट्सअ‍ॅप अकाउंट बंद करण्याआधी रिअ‍ॅक्टिव्हेट केल्यास तुम्हाला परत जुणे मजकूरही मिळतील.