होळी खेळताना जर मोबाईलमध्ये पाणी गेले असेल तर करा ‘हे’ उपाय, फायदा होईल

पोलिसनामा ऑनलाईन – आज २९ मार्च संपूर्ण भारतात होळी खेळली जाते. काही लोक होळीला ‘रंगांचा सण’ म्हणतात. या दिवशी लोक एकमेकांना रंग लावतात आणि पाण्याने होळी खेळली जाते. अशा परिस्थितीत जर तुम्ही पाण्याने होळी खेळत असाल आणि मोबाईल तुमच्या जवळ आहे तर फोन अशा ठिकाणी ठेवा ज्यामुळे मोबाईलवर पाणी पडणार नाही. परंतू चुकीने तुमच्या मोबाईलवर पाणी पडले तर तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. कारण आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की जर तुमचा मोबाईल भिजला असेल तर तुम्हाला काय करावं लागेल.

मोबाईल पाण्यात भिजल्यास अथवा काही कारणास्तव मोबाईलवर पाणी पडल्यास सर्वात आधी त्याला कोरड्या ठिकाणी ठेवा. काळजी घ्या की मोबाईल जास्त हलवला जाणार नाही पाहिजे आणि मोबाईलला त्वरित कोरड्या कपड्याने पुसून घ्या.

फोन पाण्यात पडल्यानंतर मोबाईलला चेक करण्यासाठी कोणतेही बटन अथवा टच करू नका. असे केल्याने मोबाईल फोनचे फंक्शन ऑन होतील आणि डिवाइसचा बोर्ड क्रॅश होऊ शकतो.

मोबाईलला तात्काळ कोरड्या कपड्याने पुसून घ्या. जर तुमच्या मोबाईलमध्ये जास्त पाणी गेले असेल तर व्हॅक्युम अथवा ड्रायरने कोरडे करा. परंतू याचा जास्त वापर करू नका कारण त्यामुळे फोनमधील पार्ट जास्त गरम होतील.

तांदळाचा वापर करा
त्यानंतर मोबाईल फोनमधील आर्द्रता कमी करावी लागेल. यासाठी पाकिटात तांदूळ घेऊन त्यामध्ये फोन ठेवा. फोनमध्ये हिगरोस्कोपिक गुण आहे ज्यामुळे आर्द्रता सहज दूर केली जाते. याशिवाय तुम्ही सिलिका पाकीट वापरू शकता.

जेव्हा तुम्हाला असे वाटेल की मोबाईल फोनमधील आर्द्रता निघून गेली आहे तेव्हा मोबाईल टेक्निशियनकडे घेऊन जा आणि मोबाईला दुरुस्त करून घ्या. स्वतः मोबाईल फोनला स्विच ऑन करू नका.