भन्नाट ट्रिक ! WhatsApp च्या ‘या’ फिचरचा वापर करुन कोणालाही ट्रॅक करणे झाले सोपे

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – इन्स्टंट मेसेजिंग अ‍ॅप WhatsApp नेहमीच युजर्सच्या मागणीनुसार अपडेट होत असतं. कंपनी युजर्सच्या मागणीनुसार सातत्याने नवनवे फिचर्स रोलआउट करत असते. त्यामुळेच हे जगभरातील सर्वाधिक वापरलं जाणारं मेसेजिंग अ‍ॅप आहे. WhatsApp वापरणाऱ्यांची भारतात मोठी संख्या आहे. आज स्मार्टफोन वापरणारा प्रत्येकजण या अ‍ॅपचा वापर करतोच. WhatsApp ने एक महत्त्वाचं फिचर आणलं आहे. ज्याच्यामुळे तुम्ही कोणताही पत्ता सहज शोधू शकता. या फिचरच्या माध्यमातून तुमचे लोकेशन तुमच्या घरच्यांना किंवा मित्रांना पाठवू शकता. या फिचरचा उपयोग सुरक्षेसाठी देखील करता येतो. जाणून घ्या हे फिचर कसे वापरायचे.

असे वापरा फिचर

1. सर्वप्रथम तुमचे WhatsApp उघडा.
2. आता चॅट पर्यायावर जा.
3. त्यानंतर तुम्हाला ज्या व्यक्तीला तुमचे लोकेशन पाठवायचे आहे, त्याचे नाव सिलेक्ट करा.
4. WhatsApp चॅटमध्ये खाली + किंवा क्लिप आयकॉन दिसेल, त्यावर क्लिक करा.
5. या ठिकाणी तुम्हाला लोकेशन हा पर्याय निवडायचा आहे.
6. याठिकाणी तुम्हाला Send Your Current Location आणि Share Live Location असे दोन पर्याय दिसतील.
7. तुम्हाला जो पर्याय सोयीस्कर वाटतो तो पर्याय निवडा आणि तुमचे लोकेशन पाठवू शकता.

लोकेशन पाठवताना या गोष्टी लक्षात ठेवा

जर तुम्ही तुमच्या घरच्यांना किंवा इतर एखाद्याला तुमचे करंट लोकेशन पाठवले तर तुम्ही ज्या ठिकाणी आहात त्या ठिकाणचे लोकेशन समोरील व्यक्तीला जाईल. जर तुम्ही लाईव्ह लोकेशन पाठवले तर तुमच्या हालचालींसोबत, तुम्ही जसा प्रवास करत असाल तसे लोकेशन बदलत राहील. हे लोकेशन तुम्हाला 15 मिनिटे, 1 तास किंवा 8 तासांसाठी पाठवावे लागेल. याचा देखील पर्याय तुम्हाला मिळतो. थोडक्यात, जर तुम्हाला एखाद्या व्यक्तीने तुम्हाला लाईव्ह लोकेशन पाठवले तर तुम्ही त्या व्यक्तीला ट्रॅक करु शकता. तुम्ही तुमच्या सोयीनुसार पर्याय निवडू शकता. जर तुम्हाला तुमचे लाईव्ह लोकेशन शेअरिंग बंद करायचे असेल तर लाइव्ह लोकेशन शेअरवर जाऊन स्टॉप बटन दाबा. लाईव्ह लोकेशन शेअरिंग बंद होईल.