मोदी सरकार ‘हा’ व्यवसाय सुरू करण्यासाठी देतय 3.75 लाख रूपये, तुम्ही देखील घेऊ शकता फायदा, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – नरेंद्र मोदी सरकारने ग्रामीण तरुणांसाठी रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी मोठे पाऊल उचलले आहे. यासाठी कृषी मंत्रालयाच्या अंतर्गत माती चाचणी योजना (Soil Health Card Scheme) तयार केली गेली आहे. कृषी व शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी सांगितले की या योजनेंतर्गत ग्रामीण युवक आणि शेतकरी ज्यांचे वय 18 ते 40 वर्षे आहे ते गाव पातळीवर मृदा चाचणी प्रयोगशाळा स्थापन करू शकतात. प्रयोगशाळेची उभारणी करण्यासाठी 5 लाख रुपये खर्च होणार असून त्यापैकी 75 % अर्थात 3.75 लाख रुपये सरकार देणार आहे.

काय आहे मृदा चाचणी योजना
कृषीमंत्र्यांच्या म्हणण्यानुसार बचतगट, शेतकरी सहकारी संस्था, शेतकरी गट किंवा शेतकरी उत्पादक संस्थानी ही प्रयोगशाळा स्थापन केल्यास त्यांनाही ही मदत मिळेल. मातीचे सॅम्पलिंग, चाचणी व मातीची चाचणी कार्ड उपलब्ध करुन देण्यासाठी सरकारकडून 300 प्रति नमुना प्रदान करण्यात येत आहे. मंत्री म्हणाले की, तरुण शेतकरी किंवा लॅब तयार करण्याची इच्छा असणारी अन्य संस्था जिल्ह्याचे उपसंचालक (कृषी), सहसंचालक (कृषी) आहेत. किंवा ते त्यांच्या कार्यालयात प्रस्ताव देऊ शकता.

अशी करा सुरुवात
माती तपासणीच्या प्रयोगशाळेला दोन प्रकारे सुरु करता येते. एखादी प्रयोगशाळा भाड्याने खेऊन तुम्ही कमला सुरुवात करू शकता तर दुसरी प्रयोगशाळा ही अशी असते जिला तुम्ही इकडून तिकडे घेऊन जाऊ शकता. त्याला इंग्रजीमध्ये मोबाईल सोल टेस्टींग व्हॅन ( MOBILE SOIL TESTING VAN ) सुद्धा म्हंटले जाते.

(1) प्रयोगशाळेत पाठवण्यात आलेल्या मातीची तपासणी करून त्यानंतर त्याचा अहवाल बनवून त्याची प्रत इमेलद्वारे ग्राहकापर्यंत पोहचवली जाईल. परंतु पहिल्या पर्यायांपेक्षा दुसरा पर्याय जास्त फायदेमंद आहे.

(2) माती परीक्षण प्रयोगशाळेत विस्तृत सेवा देऊ शकतात. हा व्यवसाय एका छोट्या स्तरावरून सुरू होऊ शकतो आणि जेव्हा याचा पूर्ण आत्मविश्वास येईल, तेव्हा त्याच आधारावर हा व्यवसाय देखील वाढवता येऊ शकतो.

(3) शेती व्यतिरिक्त व्यवसायिक खाद्य प्रसंस्करण (Food Processing) बाबतचे उद्योग देखील सुरु करता येऊ शकतात. वीज, बायोइंधन, खत, कृषी यंत्रसामग्री इत्यादी तयार करणार्‍या अशा कंपन्यांना नंतर व्यापारीदेखील सेवा देऊ शकतात.

फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/policenama/