आता ‘व्हाट्सअ‍ॅप’ लँडलाईन वर देखील वापरता येणार, जाणून घ्या प्रक्रिया

पोलीसनामा ऑनलाईन टीम – आपल्या दैनंदिन जीवनाचा व्हाट्सअ‍ॅप एक महत्वपूर्ण भाग बनले आहे. वैयक्तिक जीवनाबरोबरच व्यावसायिक क्षेत्रासाठीदेखील व्हाट्सअ‍ॅप चा वापर केला जातो. दर काही दिवसांनंतर व्हाट्सअ‍ॅप चे आधुनिक व्हर्जन येत आहे, ज्यामध्ये नवनवीन सुविधांसह ग्राहकांच्या सोयीसाठी अनेक बदल देखील केले जात आहेत. आपल्याला आत्तापर्यंत माहीत आहे की व्हाट्सअ‍ॅप केवळ मोबाइल नंबर वर चालू करता येते. पण नुकत्याच काही दिवसांपूर्वी आलेल्या व्हाट्सअ‍ॅप ‘बिझनेस अ‍ॅप’ च्या लेटेस्ट व्हर्जन मध्ये लँडलाईन नंबर वर देखील व्हाट्सअ‍ॅप वापरता येण्याची सोय आहे.

यामुळे किरकोळ दुकानदारांना व्हाट्सअ‍ॅप चा वापर आपल्या लँडलाईन क्रमांकावर करता येणार असून याची व्यवसायात मदत देखील होऊ शकेल. यामुळे व्हाट्सअ‍ॅप आणखी सुरक्षित झाले आहे. मात्र लँडलाईन वर व्हाट्सअ‍ॅप कसे लॉगिन करणार असा प्रश्न तुम्हाला पडला असले. त्यासाठी आम्ही तुम्हाला यासाठीची प्रक्रिया सांगत आहोत.

१) तुमच्या मोबाईल फोन किंवा कॉम्पुटर वर ‘व्हाट्सअ‍ॅप बिझनेस’ डाउनलोड करावे लागेल.

२) त्यानंतर विचारलेल्या मोबाईल नुंबरच्या जागी तुम्ही लँडलाईन नंबर देखील देऊ शकता.

३) यानंतर क्रमांक पडताळणीसाठी तुम्हाला लॉगिन मेसेजद्वारे ओटीपी पाठवला जाईल. त्यानंतर १ मिनिटाने पुन्हा ओटीपी मिळविण्यासाठी एसएमएस अथवा कॉल चा पर्याय मिळतो. तेव्हा तुम्ही ‘कॉल मी’ चा पर्याय निवडल्यास तुम्हाला कॉल येईल.

४) या कॉलद्वारे मिळालेला ६ अंकी ओटीपी तुम्ही व्हाट्सअ‍ॅप अकाउंट लॉगिन करण्यासाठी करू शकता.

५) यानंतर व्हाट्सअ‍ॅप चा वापर तुम्ही तुमच्या लँडलाईन क्रमांकावरून करू शकता.

व्हाट्सअ‍ॅप बिझनेस च्या या नवीन सुविधेचे सर्वत्र स्वागत होत असून याचा वापरदेखील वाढत आहे.

आरोग्यविषयक वृत्त –