‘हा’ व्यवसाय करण्यासाठी मोदी सरकार मदत करणार, घर बसल्या कमवा लाखो रूपये, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – व्यवसाय करू पाहणाऱ्यांसाठी एक खुश खबर आहे आता मोदी सरकार मत्स पालन करू इच्छिणाऱ्यांसाठी मोठ्या मदतीचा हात देणार आहे. पशुसंवर्धनडेरी आणि मत्स पालन मंत्रालयाने अशा योजनेची सुरवात केली आहे जी योजना मत्स पालनाबाबत कर्ज आणि शेतकऱ्यांना मार्गदर्शन करेल.

25 हजार करोड रुपये खर्च करणार सरकार
केंद्रीय पशुसंवर्धन मंत्री गिरिराज सिंह यांनी सांगितले की, केंद्र सरकार मत्स पालनासाठी 25 हजार करोड रुपये खर्च करणार आहे. मासेमारी करणाऱ्या छोट्या व्यवसायिकांना प्रेरणा देण्यासाठी आणि समुद्रातील माशांचे उत्पादन वाढवण्यासाठी ही योजना प्रयत्न करणार आहे.

मत्स पालनासाठी भारत उपयुक्त का आहे ?
पशुसंवर्धन खाते निसर्ग आणि त्याच्याशी संलग्न असलेल्या गोष्टींबाबत संपूर्ण माहिती घेत आहे. तसेच मत्स पालनाबाबतच्या गोष्टींवर युद्धपातळीवर काम सुरु आहे. बेरोजगार तरुणांसाठी आणि शेतकऱ्यांनी या योजनेचा फायदा घ्यायला हवा. देशातील 60 टक्क्यांहून अधिक लोक मासे खातात त्यामुळे मत्स पालनाचा व्यवसाय इथे मोठ्या पद्धतीने सुरु होणे गरजेचे आहे.

सुरु करा मत्स पालन
आपला देश हवामान, निसर्ग आणि पाण्याच्या बाबतीत मत्स पालनासाठी खुप अनुकूल आहे त्यामुळे सरकार या योजनेला प्रोत्साहन देत आहे. जुन्या काळातील सामग्री न वापरता आजकाल शेतकरी नवीन यंत्रणांचा वापर करून मासेमारी करतात. स्वतः शेततळे बांधून त्यात मत्स पालन आता सुरु करण्यात आले आहे.

वीस लाखांपर्यंतचा खर्च येऊ शकतो
वीस हजार किग्रॅ टॅंक अर्थात तळे करण्यासाठी वीस लाख खर्च येऊ शकतो मात्र पाच लाखांची तरतूद केल्यावर केंद्र सरकार या प्रोजेक्टवर आठ लाख रुपये आणि राज्य सरकार चार लाख रुपये इतकी सबसिडी देते. या व्यतिरिक्त सरकार पाच लाखांपर्यंतचे बँक लोन सुद्धा देते. मोदी सरकार राज्य सरकार सोबत मिळून मत्स पालनासाठी मोठी योजना राबवत आहेत ज्यानुसार सरकार व्यवसायासाठी लागणार 75 % खर्च स्वतः उचलत आहे.

किती असेल नफा
जर तुम्ही आरएएस च्या माध्यमातून मत्स पालनाचा व्यवसाय करू इच्छित असाल तर पाच लाखांपर्यंतची तरतूद तुम्हाला स्वतः करावी लागणार आहे. या खर्चामुळे वीस हजार किग्रॅ वजनाचे मासे पाळता येणार आहेत. ज्यातून जवळ जवळ पंधरा लाखांपर्यंत नफा होऊ शकतो.

कसे आहे नेमके तंत्रज्ञान
‘रिसर्कुलर एक्वाकल्चर सिस्टम’ मध्ये पाणी भरण्याची आणि साठवण्याची व्यवस्था केली जाते. यासाठी कमी जागा आणि कमी पाणी लागते. सर्वसाधारण मासेपालन करताना एका एकरात केलेल्या प्रकल्पामध्ये जेवढा फायदा मिळत नाही त्याहून अधिक फायदा या पद्धतीने मत्स पालन केल्यामुळे मिळतो. कारण याचे गणित हे प्रत्येक माश्याला लागणाऱ्या पाण्यावर अवलंबून असते.

Visit – policenama.com 

You might also like