स्वत:चा व्यवसाय सुरु करताय ? मग ‘या’ 5 ‘टिप्स’ नक्की वाचा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोणताही व्यवसाय सुरु करायचा म्हणलं की तुमच्याकडे फक्त साधन सामुग्री असून चालत नाही. तुमचा व्यवसाय आणि तुमचं उत्पादन अधिक दर्जेदार करण्यासाठी तुम्ही काटेकोरपणे अभ्यास केला तर तुम्ही उत्तम नफा कमाऊ शकतात. त्यासाठी काही सोपे पण प्रभावी गोष्टी तुम्हाला कराव्या लागतील.

कोणताही व्यवसास सुरु करायचं म्हणलं की उत्तम आयडिया हवी. तुम्हाला सुचलेली कल्पना कागदावर लिहून काढा कारण लिहिलेल्या गोष्टी जास्तकाळ स्मरणात राहतात आणि आवश्यक वेळी मिळतात. तुम्हाला जो व्यवसाय सुरु करायचा आहे त्याची थोडी माहिती काढा. बाजारात तसा व्यवसाय आहे का ते पाहा आणि लोक तुमच्या व्यावसायातून उत्पादित झालेल्या वस्तू सेवांकडे का वळतील याची माहिती जमा करा. अभ्यास करा.

1. मार्केट अ‍ॅनालिसिस –
बाजारात सध्याच्या घडीला काय ट्रेण्डमध्ये आहे त्याचा अभ्यास करा. आपण करत असलेल्या व्यवसाय दुसरं कोणी करत आहे का हे पाहा. त्यापेक्षा आणखी वेगळं आपण बाजारात काय आणू शकतो ते पाहा. आराखडा तयार करा.

2. जागा आणि बजेट –
व्यवसायाचं गणित बजेट पाशी येऊन थांबते, व्यवसाय म्हणलं की जागा आणि खर्च यावर सर्व काही अवलंबून असते. कारण आर्थिक गणित त्यावर आधारीत असते. ते कोलमडले की व्यवसायात तोटा होता. त्यामुळे आधीच जागेपासून एकूण विक्रीपर्यंत खर्च काढणं महत्वाचं असतं. त्यासाठी आवश्यक ती तडजोड करणं. वेळ प्रसंगी जास्त पैसा बाजूला ठेवणं. तुटीच्या काळात या पैशांचा वापर होऊ शकतो.

3. पॅकेजिंग आणि मार्केटिंग –
तुमचं उत्पादन खाद्य पदार्थांचे किंवा वस्तू रूपात असेल तर त्याच पॅकेजिंग आकर्षक हवे. जर तुम्ही सेवा देत असाल तर ग्राहकांपर्यंत पोहचण्यासाठी प्रतिक्रिया आवश्यक आहेत. ती सेवा अथवा उत्पादन ग्राहकांपर्यंत पोहचले तर ग्राहक पुन्हा येतील. तुम्ही वृत्तपत्र, वेबसाइट्स, पँपलेट यावर जाहिरात देऊ शकतात. फेसबुकवर तुमचे पेज प्रमोट करु शकतात. व्हॉट्सअ‍ॅप सह इतर सोशल मिडिया अकांऊंटवर देखील जाहिरात देऊ शकतात.

4. ग्राहकांची विश्वासहर्ता –
व्यवसाय म्हणलं की ग्राहकांचा तुमच्यावरील विश्वास अत्यंत महत्वाचा ठरतो त्यामुळे त्याला धक्का लागेल असे कोणतेही वर्तन करुन नका. कोणतीही चूक होणार नाही याची काळजी घ्या.

5. उत्पादन बाजारात आणल्यानंतर त्याच्या किंमतीपासून पॅकेजिंगपर्यंत ग्राहकाला ते उत्पादन चांगलं आहे आणि त्याचे फायदे कसे आहेत हे पटवून देणं तुम्हाला आलं पाहिजे. येथेच तुमच्या हुशारीचा आणि हजरजबाबीपणाचा कस लागलो.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/

You might also like