Coronavirus : हवेतून कोरोना पसरतो म्हणून घाबरून न जाता ‘या’ पध्दतीनं करा बचाव, तज्ज्ञांनी सांगितलं

वॉशिंग्टन : वृत्त संस्था – जगात कोरोनाचा कहर सुरु असतानाच द लॅसेट या वैद्यकील नियकालिकात हवेतून कोरोना विषाणूचा फैलाव होत असल्याचे म्हंटले आहे. यामुळे अनेक देशात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र, मॅरिलँड स्कूल ऑफ मेडिसिनचे डॉ. फहीम युनूस यांनी चिंता करण्याची अथवा अनावश्यक भीती बाळगण्याची आवश्यकता नाही असे सांगितले आहे.

त्यांच्या मते, हवेतून विषाणूचा संसर्ग होतो म्हणजे हवा संसर्गबाधित आहे, असा त्याचा अर्थ होत नाही. हवेत विषाणू असू शकतो.कोरोना विषाणू लाळेतील तुषारकण हवेत असल्याने फैलावतो. सध्या मास्कचा वापर करण्यात येत आहे. परंतु, कापडी मास्कचा वापर करणे टाळणे आवश्यक आहे. एन ९५ किंवा केएन ९५ मास्कचाच वापर करावा. शक्यता एक मास्क एकच दिवस वापरावा त्यानंतर त्याचा वापर करु नये. २४ तासानंतर शक्यतो नवीन मास्क वापरण्याचा सल्लाही डॉ. फहीम यांनी दिला.

डॉ. फहीम यांच्या मते, घरीच राहून संसर्गावर मात करता येऊ शकतो. पण त्यासाठी काही गोष्टींचे पालन करणे आवश्यक आहे. तसे झाल्याचे घरीच राहून ८० ते ९० टक्के लोक कोरोनावर मात करु शकतात. प्रत्येकाने दररोज तापमान तपासणे, श्वासाचा वेग, हृदयाचे ठोके आणि रक्तदाब मोजला पाहिजे. पल्स ऑग्जिमेंट्री ॲप अनेक स्मार्टफोनमध्ये उपलब्ध आहेत. त्याद्वारे ऑग्ज ९० पेक्षा कमी असल्यास अथवा रक्तदाब ९० सिस्टोलिकपेक्षा खाली आल्यास त्वरीत डॉक्टरांशी संपर्क साधवा, असेही त्यांनी सांगितले.