ताज्या बातम्या

बँकेतील अकाऊंटमध्ये जमा असतील पैसे तर जाणून घ्या ‘या’ गोष्टी, SBI नं केली सूचना

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – नुकतेच पंजाब अँड महाराष्ट्र बँकेतील खातेधारकांना मोठ्या प्रमाणात झटका बसला होता. हजारो खातेधारकांना बँकेने घोटाळा केल्यामुळे मनस्ताप सहन करावा लागला होता. सध्या को-ऑपरेटिव बँकांची नोंदणी रजिस्ट्रार ऑफ को-ऑपरेटिव्स यांच्याकडे होते. त्यांच्याकडे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियासारखी विशेष तंत्रज्ञान नाही. त्याचबरोबर त्यांच्याकडे बँकांना नियमित करण्याची ताकद देखील नाही. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला तुमचे पैसे सुरक्षित ठेवण्यासाठी काही महत्वाचे नियम सांगणार आहोत.

1. को-ऑपरेटिव्स बदला
देशातील सर्वात मोठी सेवा असलेली को-ऑपरेटिव्स बँक या मल्टी स्टेट को-ऑपरेटिव सोसाइटीज एक्ट 2002 या अंतर्गत रजिस्टर करण्यात आल्या आहेत. यांना लवकरात लवकर स्मॉल फायनान्स बँकांमध्ये बदलायला हवे. त्याचबरोबर यांच्या व्यवसायाच्या रकमेवर देखील मर्यादा आणायला हवी. यासाठी आरबीआयला विशेष सादरीकरण करायला हवे.

2. को-ऑपरेटिव्सला आरबीआयने रेग्युलेट करणे
सध्या आरबीआय या बँकांवर लक्ष ठेवू शकत नाही. त्याचबरोबर या बँकांवर ते निर्बंध देखील टाकू शकत नाही. त्यामुळे सरकारने या नियमांवर संशोधन करून या बँकांवर आरबीआयने लक्ष देण्यासाठी कायदा करायला हवा.

3. को-ऑपरेटिव बँकांसाठी संगठन
अर्बन को-ऑपरेटिव बँकांसाठी एक अंब्रेला ऑर्गेनाइजेशन तयार करण्याची तयारी आरबीआयने करायला हवी. यामुळे बँका आर्थिक पातळीवर अतिशय मजबूत होणार असून गुंतवणूकदारांचा देखील आत्मविश्वास वाढणार आहे.

4. डिपॉजिट इन्श्युरन्समध्ये बदल
गुंतवणूकदारांनी जमा केलेल्या रकमेवर असणाऱ्या इन्शुरन्सच्या रिकामेमध्ये वाढ करण्याची मागणी करण्यात आली आहे. त्यामुळे गुंतवणूकदार गुंतवणूक करण्यास धजावतील आणि त्यांना भीती देखील राहणार नाही.

Visit : Policenama.com 

Back to top button