तुमच्या घोरण्याने जवळचे असतील त्रस्त, तर करा ‘हे’ 4 खास घरगुती उपाय

तुमच्या घोरण्याच्या सवयीने तुम्ही त्रस्त असाल, किंवा घरातील एखाद्या व्यक्तीच्या घोरण्याने तुमच्या झोपेचं खोबरं होत असेल आणि झोप पूर्ण होत नसेल, तसेच यामुळे चिडचिडेपणा आला असेल, तर आम्ही तुम्हाला सांगणार आहोत असे उपाय, जे केल्याने या वाईट सवयीपासून सुटका होऊ शकते.

करा हे उपाय

1 झोप पूर्ण न झाल्याने सुद्धा ही समस्या होते. यासाठी रोज योग्यवेळी आणि किमान आठ तासांची झोप घेतली पाहिजे. यासाठी घरातील व्यक्तींना सुद्धा योग्यवेळी आणि पूर्ण झोप घेण्यास प्रोत्साहित करा.

2 झोप न येणे म्हणजेच निद्रानाशावर सध्या अनेक लोक गोळ्या घेतात. परंतु, या गोळ्यांमुळे सुद्धा घोरणे वाढते. यासाठी अशा गोळ्या टाळण्याचा प्रयत्न करा.

3 चुकीच्या जीवनशैलीमुळे सुद्धा घोरण्याची समस्या होते. अवेळी खाणे, आराम न करणे, सिगरेट इत्यादीमुळे हे होते. यासाठी जीवनशैली सुधारणा करा.

4 अनेक लोक दारू सेवन करण्याच्या सवयीमुळे सुद्धा घोरतात. यासाठी झोपण्यापूर्वी तीन तास अगोदर दारू घेऊ नका. यामुळे घोरणे खुप कमी होते.