उन्हाळ्यात बाळाची काळजी कशी घ्यावी, जाणून घ्या

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – सध्या उन्हाने तापामाणात प्रचंड वाढ झाली आहे. त्यामुळे आपल्या शरिरावर त्याचे विपरित परिणाम होत असतात. त्याचा त्रासही मोठ्या प्रमाणात होतो. त्यामुळे आपण आपली चांगली काळजी घेतो. उन्हात सनक्रिम लावणं, योग्यवेळी पाणी पिणं, शिवाय आपण आपल्या आहारात हवे तसे बदल करतो. मात्र लहान मुलं ही नाजूक असतात, त्यांची उन्हाळ्यात जास्त काळजी घेतली पाहिजे. कारण लहान मुलांची त्वचा ही लहान असते, त्यामुळे त्यांच्यावर लवकर परिणाम होतो. त्यामुळे त्यांची काळजी घेणं अधीक महत्त्वाचे असतेय. शरिरातील पाण्याची कमतरता आणि डायरीया यांसारख्या समस्या उद्भवतात.

लहान मुलांतची उन्हाळ्यात नेमकी कशी काळजी घ्यावी हे जाऊन घेऊयात-
१) लहान मुलांना सुती कपडे घालता येतील याकडे लक्ष द्या. पण कपडे घट्ट नको. सिंथेटिक कापड वापरल्यामुळे मुलांच्या अंगात उष्णता टिकून राहते. त्यामुळे त्यांच्या अंगावर घामोळ्या येऊ शकतात. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणतंही क्रीम लावू नका.
२) उन्हाळ्यात मुलांच्या झोपण्याच्या गादीवर सुती चादर अंथरायला हवी. सुती चादर त्वचेसाठी फार लाभदायक असते.
३) लहान मुलांच्या ओल्या कपड्यांचा आपण कंटाळा करतो. त्यामुळे मुलांसाठी डायपरचा वापर करतो. मात्र उन्हाळ्यात हा वापर कमी केला पाहिजे. कारण उन्हाळ्यात डायपरमुळे त्वचेला इजा होते. डायपरऐवजी मुलासांठी कपड्याचा वापर करावा. त्यामुळे त्यांची त्वचा कोरडी राहते आणि त्यांना त्रास होत नाही.

४) उन्हाळ्यात मुलांच्या आहारात लस्सी, मिल्क शेक, फळांचा ताजा रस अणि नारळपणी अशा पदार्थांचा समावेश असायला हवा.
५) जर तुमचं बाळ सहा महिन्यांपेक्षा लहान असल्यास आणि फक्त स्तनपान करत असल्यास त्याला अतिरिक्त पाण्याची गरज        नाही. कारण या दुधात मुळातच पाणीच असते.
६) जी मुले बाटलीने दूध पितात त्यांच्यासाठी गरम पाणी उकळून थंड केलेले पाणी देणे हितकारक ठरते.
७) उन्हाळ्यात मुलांची मालिश टाळावी. कारण मालिश करताना वापरले जाणरे तेल आणि पेट्रोलियम जेलीमुळे त्यांच्या त्वचेवरचा  घाम तसाच राहतो.

८) मालिश करायचीच असल्यास ऑलिव्ह ऑईल किंवा नारळाच्या तेलाचा वापर करावा. मात्र अंघोळीच्या वेळी हे तेल पूर्णत:        स्वच्छ होईल, याकडे लक्ष द्यावे.
९) ऊन वाईट नाही. लहान मुलांची उंची वाढते, उंची चांगल्या प्रकारे वाढण्यासाठी कोवळ्या उन्हाचा उपयोग होतो.
१०) शरीरातील ‘ड’ जीवत्त्वाची कमतरता आणि हाडांची झीज टाळण्यासाठीही त्वचेवर कोवळे ऊन पडणे चांगलेच. शिवाय ऊन हे  जंतूंचा नाश करणारे आहे. कडक उन्हापासून मात्र काळजी घ्यायलाच हवी.

तसंच उन्हाळ्यात लहान मुलांसाठी काळजीचा विषय असतो ते मुलांच्या अंगातील उष्णतेमुळे आलेल्या घामोळ्या. त्यासाठी आपण घरच्या घरी उपाय करू शकतो. जसं ताक किंवा दह्यातील पाणी घाम आलेल्या जागी लावावे. किंवा मुलतानी माती किंवा गुलाब पाण्याचाही वापर करू शकता. दहा मिनिटांनंतर धुवून टाकावी. त्याने घामोळ्या येत नाहीत. तसंच बाजारातून घामोळ्यांच्या पावडरचा वापर आपण अधिक करतो, मात्र शक्यतो हा वापर टाळावा.