आता घरबसल्या SBI मधील ‘अकाउंट’ एका शाखेतून दुसऱ्या शाखेत ‘असे’ करा ट्रान्सफर
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – स्टेट बँक ऑफ इंडिया ग्राहकांना नेहमीच नवनवीन सुविधा देत असते. ग्राहकांना नवीन योजनांचा लाभ घेता यावा यासाठी बँक सतत प्रयत्न करत असते. आता एसबीआयने ब्रांच ट्रान्सफर करणाऱ्या ग्राहकांना दिलासा देणारी सुविधा आणली आहे. तुम्ही आता घरबसल्या ऑनलाईन पद्धतीनं ब्रांच ट्रान्सफरची करू शकता. केवळ आठवड्याभरात तुम्ही हे काम पूर्ण करू शकता. यापूर्वी एसबीआयची ब्रांच एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ट्रान्सफर करण्यासाठी अनेक फॉर्म भरावे लागत होते परंतु, नेट बँकींगमुळे हे काम अगदी सोप्पं झालं आहे.
ब्रांच ट्रान्सफर करण्यासाठी ह्या स्टेप्स फॉलो करा –
ब्रांच ट्रान्सफर करण्यापूर्वी तुम्हाला ज्या ब्रांचमध्ये ट्रान्सफर करायचं त्या ब्रांचचा कोड माहीत करू घ्या. फोनवरून किंवा ऑनलाईनही तुम्ही हा कोड माहीत करून घेऊ शकता.
www.onlinesbi.com वर जाऊन पर्सनल बँकिंगमध्ये युझरनेम आणि पासवर्ड टाकून लॉग इन करा
e services या ऑप्शनवर क्लिक करा
त्यानंतर Transfer of savings account ऑप्शनवर क्लिक करा
त्यात तुम्हाला अकाऊंट क्रमांक आणि ब्रांच नेम दिसेल. त्यातून ट्रान्सफर अकाऊंट ऑप्शन निवडा.
तुम्हाला ज्या ब्रांच मध्ये ट्रान्सफर करायचंय ती सिलेक्ट करून कन्फर्म करा.
ब्रांच ट्रान्सफरसाठी नियम व अटी –
ब्रांच ट्रान्सफर केवळ सेव्हिंग अकाऊंटसाठी असणाऱ्यांनाच करता येणार आहे.
ब्रान्च ट्रान्सफरसाठी तुमचा मोबाईल क्रमांकही रजिस्टर पाहिजे .
यासाठी तुम्ही केवायसी पूर्ण केलेली असायला हवी.
तुमच्याकडे नेट बँकिंगची सुविधा असायला हवी.