तुम्ही सुध्दा विसरलात स्मार्टफोनचा ‘स्क्रीन लॉक’, तर ‘या’ पध्दतीनं उघडा फोन, जाणून घ्या

नवीदिल्ली : वृत्तसंस्था – आपला फोन दुसरा कोणी घेऊन वापरू नये किंवा पाहू नहे यासाठी अनेक जण आपल्या फोनला वेगवेगळ्या प्रकारचे लॉक करत असतात. परंतु अनेकदा काही लोकांना फोनचा पासवर्ड किंवा पॅटर्न लक्षात रहात नाही मग अशा वेळेस फोन फॉरमॅट करावा लागतो. मात्र अशा प्रकारापासून वाचण्यासाठी आम्ही तुम्हाला काही महत्वाचे उपाय सांगणार आहोत. ज्यामुळे तुम्ही सहज फोन अनलॉक करू शकता.

अँड्रॉइड डिवाईसची घ्या मदत
अँड्रॉइड डिवाईस मॅनेजर गुगल अकाउंटला लिंक केलेला असतो, त्यामुळे जर फोनचा पासवर्ड विसरला तर दुसऱ्या फोनमध्ये गुगल वरून लॉगिन करून फोन सर्च करू शकता आणि त्यानंतर सोईस्कररित्या स्मार्टफोन अनलॉक करू शकता. परंतु यासाठी फोनमध्ये इंटरनेट कनेक्शन सुरु असणे गरजेचे आहे.

फॉरमॅट फीचरचा करू शकता वापर
जर पाच पेक्षा अधिक वेळा तुम्ही पॅटर्न टाकलात तर फोन तुम्हाला काही कालावधी नंतर प्रयत्न करण्यास सांगतो. यानंतर तुम्हाला लगेच मसेजच्या आसपास क्लीक करावे लागेल. मग तुम्हाला फरगॉट चा पर्याय दिसेल ज्यावर क्लिक करून इमेलच्या माध्यमातून तुम्ही नवीन पॅटर्न सेट करू शकता.

फाइंड माय मोबाइल
जर तुम्ही सॅमसंग फोनचा वापर करत आहात तर फाइंड माय मोबाइलचा वापर करू शकता. सगळ्यात आधी तुम्हाला https://findmymobile.samsung.com/ या लिंकवर जाऊन एक नवीन अकाउंट बनवावे लागेल. मग यावरील लॉक माय स्क्रीन वर जाऊन तुम्ही तुमचा फोन अनलॉक करू शकता.

डेटा रिसेट
चौथा पर्याय हा अगदी सोप्पा आहे परंतु यामध्ये तुमच्या फोनमध्ये असणारा संपूर्ण डेटा डिलीट होऊन जाईल. सगळ्यात आधी फोन ऑफ करा त्यानंतर आवाज वाढवण्याचे आणि फोन चालू करण्याचे बटन एक साथ दाबा. यानंतर तुम्हाला काही पर्याय दिसतील यामध्ये Wipe data/factory reset>Reboot system now वर क्लिक करून तुम्ही फोन रिसेट करू शकाल. यामध्ये तुमचा फोन अनलॉक होऊन जाईल परंतु फोनमधील सर्व डेटा डिलीट होऊन जाईल.

Visit : Policenama.com