Weight Loss साठी लाभदायक आहे केळी, अशाप्रकारे करा वापर

नवी दिल्ली : वजन कमी करण्यासाठी डाएट आणि वर्कआउट या दोन गोष्टी महत्वाच्या असतात. हेल्दी डाएटमध्ये केळ्याचा समावेश आवश्य करा. यामध्ये पोटॅशियम, कार्बोहायड्रेट आणि व्हिटॅमिन सी भरपूर असल्याने इंन्स्टट एनर्जी मिळते.

कमी कॅलरीज
केळ्यात कार्बोहायड्रेट्स जास्त असल्याने अनेक लोकांना वाटते यामुळे वजन वाढते. परंतु सत्य हे आहे की, गुड कार्ब्स आणि फायबर भरपूर असल्याने कॅलरीजची मात्रा कमी असल्याने पोट जास्तवेळ भरल्यासारखे वाटते. यामुळे वजन कमी होते.

फायबर जास्त प्रमाणात
फायबर ब्लड शुगर लेव्हल स्थिर ठेवण्यास मदत करते. पोट भरल्यासारखे वाटते, ज्यामुळे जेवण कमी होते. कमी कॅलरीचे सेवन होते. तसेच केळे खाल्ल्याने मेटाबॉलिज्म वाढते जे फॅट बर्न करते.

वेट लॉससाठी खा केळे

– रोज एकापेक्षा जास्त केळ्याचे सेवन करा.

– केळे खाण्याची योग्य वेळ वर्कआऊटच्या अगोदर किंवा नंतरची आहे. यामुळे स्टॅमिना वाढतो आणि चांगल्याप्रकारे वर्कआऊट करू शकता.

– केळ्यात पोटॅशियम असते जे पोट फुगणे आणि शरीराची वॉटर रिटेंशनची समस्या दूर करते. वॉटर रिटेंशनमुळे सुद्धा वजन वाढते, ज्यापासून दूर राहण्यास मदत करते.