क्रेडिट कार्ड वापरताय ? मग ‘या’ गोष्टी कटाक्षाने टाळाच

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन : आजकाल क्रेडिट कार्ड वापरणाऱ्यांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. क्रेडिट कार्ड अनेकवेळा आणि आणीबाणीच्या प्रसंगी मोठ्या प्रमाणावर उपयोगी पडते. पण क्रेडिट कार्ड वापरताना अनेकप्रकारे काळजी घेणं गरजेचं असतं. कारण क्रेडिट कार्ड वापरताना आपल्या खर्च करण्याच्या सवयींवर नियंत्रण न ठेवल्यास कर्जाचं मोठं ओझं होऊ शकतं. त्यामुळे मोठी डोकेदुखी होऊ शकते.

क्रेडिट कार्ड वापरताना ते मॅनेज करण्याकडे देखील लक्ष देणं गरजेचं आहे. फक्त कार्डच्या वापराकडे लक्ष न देता त्याच्या वापरावर स्वतः लक्ष ठेऊन त्याचं परिक्षण करणं गरजेचं आहे.

असं केलं नाही तर मोठ्या प्रमाणावर कर्ज डोक्यावर वाढून घ्याल. मग ते हाताळणे तुम्हालाच जड जाईल. त्यामुळे जर तुमचा क्रेडिट स्कोअर खराब झाला तर ते तुमच्या पोर्टफोलिओसाठी अजिबात चांगलं नाही. कारण क्रेडिट स्कोअर चांगला नसल्यास भविष्यात तुम्हाला कर्ज घेण्यात अनेक अडचणींचा सामना करावा लागेल. प्रत्येक बँक कर्ज देताना क्रेडिट स्कोअर पाहते कारण ते तुमची विश्वासाहर्तता मोजण्याचं एक साधन मानलं जात.

तुम्ही क्रेडिट कार्ड वापरत असताना या गोष्टी टाळणे गरजेचे आहे :
१. क्रेडिट कार्डचा वापर करून रोख स्वरूपात पैसे काढणं :
क्रेडिट कार्डचा वापर पैसे काढण्यासाठी शक्यतो न केलेला च चांगला कारण क्रेडिट कार्डानं पैसे काढल्यास तुम्हाला इंटरेस्ट फ्री पीरियड बँक देत नाही. त्यामुळे पहिल्या दिवसापासून कर्जावर व्याज लागण्यास सुरुवात होईल. त्याचबरोबर पैसे काढण्याचे चार्जेस देखील भरावे लागतील. त्यामुळे हा पर्याय अगदीच आणीबाणीच्या प्रसंगी वापरावा.

२. बिल अनेक दिवसांसाठी पेंडिंग ठेवणं : क्रेडिट कार्ड वापरणाऱ्यांना एकावेळी कमीतकमी पाच टक्के बिल भरावं लागतं. तरीही पूर्ण बिल भरल्यास उत्तमच कारण बिल पुढे ढकलणं योग्य नाही. क्रेडिट बिल ठरलेल्या तारखेला भरलेलं नेहमी चांगलं कारण तसं केलं नाही तर तुमच्या समोर कर्जाचा डोंगर उभा राहू शकतो.

या गोष्टींची नक्की काळजी घ्यावी म्हणजे क्रेडिट कार्ड वापरताना तुम्हाला नुकसान किंवा तोटा न होता याचा चांगला वापर तुम्हाला करून घेता येईल.