कामाची गोष्ट ! Gmail चे मल्टीपल सिग्नेचर फीचर पाहिलेत ?

पोलीसनामा ऑनलाइन टीम – जी-मेल युजर्स साठी एक आनंदची बातमी आहे. जी-मेल युजर्सना चांगली सेवा वापरता यावी यासाठी टेक कंपनी लागोपाठ ई-मेल सर्व्हिसमध्ये नवीन फीचर्स आणत असते. तेच कंपनी जी-मेल ने नुकतेच मल्टिपल सिग्नेचरचा पर्याय आणला आहे. म्हणजेच,वेगवेगळ्या ई-मेलसाठी स्वतः सिग्नेचर क्रिएट पाठवता येईल. जी-मेल सिग्नेचर फीचरला डेस्कटॉप किंवा मोबाईल या दोन्ही व्हर्जनवर वापर करता येवू शकतो.

दिलेल्या स्टेपचा उपयोग करून ‘डेस्कटॉप’वर जी-मेल सिग्नेचर फीचरचा वापर करा – 

१) प्रथम ब्राऊजरमध्ये जावून जी-मेलचे अकाउंट लॉग इन करा.

२) नंतर वरच्या बाजूला दिलेल्या मेन्यू आयकॉनवर क्लिक करा.

३) त्यानंतर ड्रॉप-डाऊन मेन्यू मध्ये दिसत असलेल्या सेटिंग्स पर्यायावर जावा.

४) येथे तुम्हाला जनरल टॅबमध्ये स्क्रॉल डाऊन केल्यांनतर सिग्नेचर हा पर्याय दिसेन. नो सिग्नेचरच्या खाली दिसत असलेल्या बॉक्समध्ये जा. आता सिग्नेचर बॉक्समध्ये जावून माहिती भरावी लागेल. त्यानंतर एंटर करून इमेज किंवा लोगोही या बॉक्समध्ये अ‍ॅड करू शकता.

५) सिग्नेचर संबंधित माहिती टाकल्यानंतर पेजवरील सर्वात खाली दिलेल्या स्क्रॉल करा आणि सेव्ह चेंजेस बटनावरती क्लिक करा. आता सर्व नवीन आणि आउटगोइंग मेलवर तुम्हाला सिग्नेचर दिसेल. आता तुम्ही ते सिग्नेचर एडिट करा किंवा काढून टाका.

‘अँड्राॅइड’ किंवा ‘आयओएएस’ डिव्हाइसवर सिग्नेचर अ‍ॅड करण्यासाठी

आजकाल सर्व काही मोबाईल वर अवलंबून आहे. सर्वच कामासाठी अलीकडे मोबाईलचा वापर करता येवू शकतो. डेस्कटॉप शिवाय मोबाईल वर जी-मेलच्या अँड्राॅइड किंवा आयओएएस अ‍ॅपवर सिग्नेचर फीचरची मजा घेता येऊ शकते. त्यासाठी खालील स्टेपचा उपयोग करा.

१. सर्वात आधी आपल्या मोबाईल मध्ये जी-मेल अ‍ॅप ओपन करा.

२. वरच्या बाजूला दिलेल्या तीन हॉरीझॉन्टल लाईनवर टॅप करा.

३. आता सेटिंग्जवर क्लिक करा.

४. आता ज्या अकॉउंटसाठी सिग्नेचर क्रिएट करायचे आहे. त्याला टॅप करा.

५. आयओएस डिव्हाइस साठी सिग्नेचर सेटिंग मध्ये जा. मोबाईल सिग्नेचर जवळील बनवलेल्या स्लाइडरला टॉगल करा. मधील सेटिंगमध्ये जाऊन मोबाइल सिग्नेचर पर्याय दिसेल.

६. आता आपल्या मनपसंतीचे सिग्नेचर अ‍ॅड करा आणि ओके करा.