सौंदर्य आणखी खुलवायचंय ? जाणून घ्या मुलतानी मातीचे विविध फेसपॅक ! होतील ‘हे’ फायदे

पोलीसनामा ऑनलाईन टीम : आपण पार्लरला न जातानाही सुंदर चेहरा आणि चांगली त्वचा मिळवू शकतो. तुम्ही घरच्या घरीच काही फेसपॅक(Facepack) तयार करू शकता. यामुळं तुमच्या त्वचेच्या अनेक समस्या दूर होतात आणि याचे कोणते दुष्परिणामही होत नाहीत. चेहरा उजळ होण्यापासून तर त्याचा कोरडेपणाही सहज दूर केला जाऊ शकतो. आज आपण मुलमाती मातीचे ( multani soil) काही सोपे घरगुती फेसपॅक कसे बनवायचे आणि त्यांचे काय काय फायदे होतात आणि कोणत्या समस्या दूर होतात याची माहिती घेणार आहोत.

1) मध आणि मुलतानी माती – मध देखील आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर ठरतं. 1 चमचा मधात 1 चमचा मुलतानी माती मिक्स करा. तयार झालेला लेप चेहऱ्याला एकसारखा लावून तो 20 मिनिटांसाठी ठेवा. त्यानंतर साध्या पाण्यानं चेहरा स्वच्छा धुवून घ्या. यानंतर चेहऱ्याला एखादं मॉईश्चरायजर लावा. आठवड्यातून एकदा हा प्रयोग करा. यामुळं चेहऱ्याचा कोरडेपणाही दूर होईल.

2) चंदन पावडर आणि मुलतानी माती – एक चमचा मुलतानी मातीत 1-2 थेंब गुलाबपाणी मिक्स करा. त्यात अर्धा चमचा चंदन पावडर घाला. हे मिश्रण योग्य पद्धतीनं एकत्र करून ते चेहऱ्याला लावा. हा लेप 20 मिनिटे ठेवून कोमट पाण्यानं चेहरा धुवा. आठवड्यातून दोन वेळा हा प्रयोग करा. यानं चेहरा उजळण्यासाठी मदत होईल.

3) दही आणि मुलतानी माती – एक चमचा दही आणि एक चमचा मुलतानी एकत्र करा. हा लेप चेहऱ्यावर लावून तो पूर्णपणे सुकू द्या. मग कोमट पाण्यानं चेहरा धुवून घ्या. दह्यातील घटक चेहऱ्यासाठी उपयुक्त असतात. हे मिश्रण मुलतानी मातीत एकत्र केले तर त्याचा चांगला फायदा होतो. यामुळं त्वचेच्या सौंदर्यात आणखी भर पडेल.

4) हळद आणि मुलतानी माती – आयुर्वेदात हळदीला विशेष महत्त्व आहे. पाव चमचा हळद, 2 चमचे मध आणि 1 चमचा मुलतानी माती एकत्र करा. हे मिश्रण 20 मिनिटे चेहऱ्याला लावून ठेवा आणि मग चेहरा पाण्यानं धुवून घ्या. तुमचं सौंदर्य खुलवण्यात यामुळं नक्कीच भर पडेल.

टीप – वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळं काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. प्रोफेशनल अॅडव्हाईस म्हणून या लेखाचा वापर करू नये. काही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत. तसेच काही लोकांना काही पदार्थांची अॅलर्जीही असते. त्यामुळं तुम्हाला अॅलर्जी असणारे पदार्थ वापरणं टाळावं.