योग्य प्रमाणात चहा घेतल्याचे ‘हे’ 20 उपयोग, यामुळे प्रत्येकाला आवडेल हे पेय, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम – चहाची परंपरा भारतात चांगलीच रूजली आहे. चहा पीत नाही असे क्वचितच सापडतील. भारतात प्रत्येक घरी सकाळी चहा होतोच. कोरा चहा आरोग्यासाठी चांगला आहे. कोऱ्या चहामुळे व्यक्तीला उर्जा आणि स्फूर्ती मिळते. चहाचे अरोग्यासह इतरही काही उपयोग आहेत. चहाचे उपयोग खूपच कमी लोकांना माहित असावेत. हेच उपायोग आपण जाणून घेणार आहोत.

चहाचा इतिहास
भारतामध्ये आसाममधील स्थानीक लोक सन १८१५ पासून चहापासून एक पेय बनवून पित होते. १८३४ मध्ये भारताचे गव्हर्नर जनरल लॉर्ड बँटिकन यांनी एक समिती स्थापन केली. चहाची परंपरा सुरु करणे आणि याचे उत्पादन करण्याची शक्यता शोधणे हे या समितीचे काम होते. समितीच्या अहवालानंतर १८३५ मध्ये आसाममध्ये चहाचे बागिचे लावण्यात आले.

चहाचे उपयोग खालीलप्रमाणे आहेत –

1) दातांची स्वच्छता –
तुम्हाला जर तुमचे दात निरोगी आणि पांढरे ठेवायचे असतील तर नियमित एक कप ग्रीन टी अवश्य प्या. हे दातांसाठी एक चांगल्या औषधीचे काम करते.

2) पोटदुखी –
ग्रीन-टीमध्ये थोडीशी अद्रक टाकून पिल्याने पोटदूखीचा त्रास कमी होतो.

3) अल्सरच्या रोग्यांसाठी –
अल्सरमुळे वेदना होत असतील तर गार ग्रीन टी प्या. यामध्ये खुप अँटीऑक्सीडेंट्स असतात. त्यामुळे आराम मिळतो.

4) बध्दकोष्ठता –
पोट खराब झाले असेल तर गरम ग्रीन टीमध्ये दालचीनी पावडर आणि लिंबूचा रस टाकून प्या.

5) त्वचेचे व्रण –
चटका लागला तर टी-बॅग भीजवून त्याचे पाणी लावावे. असे केल्यास जळलेला व्रण राहणार नाही. जर जास्त प्रमाणात भाजले असेल तर टी-बॅग बाथ टबमध्ये टाकून त्यामध्ये बसा. त्यामुळे जळाल्याचे व्रण नाहीसे होतात.

6 ) जळजळ –
पोटाची जळजळ दूर करण्यासाठी १ कप ग्रीन टीमध्ये २ चमचे पुदीना मिक्स करुन प्या.

7) पीरियडमधील वेदना –
अनेक महिलांना पीरियडच्या काळात पोटात वेदना होत असतात. अशा वेळी ग्रीन टी प्या. यातील अँटीऑक्सीडेंट्स कोलोनला स्वच्छ करतात.

8) गॅसची समस्या दूर –
गॅसपासून सुटका मिळवण्यासाठी ग्रीन टीमध्ये पुदीना टाकून प्यावे.

9) थकवा –
सूज आणि डोळ्यांचा थकवा दूर करण्यासाठी दोन टी-बॅग कोमट पाण्यात काही वेळ ठेवा. यानंतर टी-बॅग डोळ्यांवर ठेवा. टी बॅग काही वेळ डोळ्यांवरच राहू द्या. त्यामुळे डोळ्यांचा थकवा दूर होतो.

10) वेदना –
इंजेक्शन घेतल्यावर काहीवेळा वेदना होतात. अशावेळी इंजेक्शन घेतलेल्या जागेवर टी-बॅग भीजवून ठेवल्यास वेदना कमी होतात.

11) किडा चावणे –
एखादा किडा चावल्यामुळे वेदना होत असतील तर चहाच्या पाण्यात कॉटन भिजवून वेदना होतात त्या ठिकाणावर लावा, वेदना कमी होतील.

12) पायाची दुर्गंधी –
दिर्घकाळ बूट घातल्यामुळे पायांची दुर्गंधी येते. ही दुर्गंधी दूर करण्यासाठी चहाचे पाणी बनवून त्यामध्ये पाय बुडवून बसा. काही वेळातच दुर्गंधी दूर होते.

13) माउत वॉश –
पूदीन्याचा चहा बनवून त्याने गुळणी केल्याने तोंडाची दुर्गंधी दूर होते.

14) नैर्गिक टोनर –

टी-बॅग पाण्यात भिजवून नियमित लावल्यास चेहरा ग्लो करतो. टी-बॅग एका नॅचरल टोनरचे काम करते.

15) स्क्रब –
ग्रीन टीमध्ये थोडीशी साखर आणि पाणी टाकून मसाज करा. चेहरा उजळतो.

16) पांढरे केस –
एक कप पाण्यात तीन टी बॅग्स टाका. या पाण्यात मेहेंदी टाका. रात्रभर हे मिश्रण तसेच राहू द्या. सकाळी ही पेस्ट केसांना लावा. एक तास तशीच ठेवून नंतर डोके धुवा, केसांवा डाय करण्याची गरज राहणार नाही.

17) केसांचे कंडिशनिंग –
केसांच्या कंडिशनिंगसाठी दोन ग्लास पाण्यात चार टी-बॅग टाका. हे पाणी गार करुन घ्या. शाम्पू केल्यानंतर हे पाणी केसांवर टाका, केस शायनी आणि सिल्की होतील.

18) दातदूखी –
एका बाउलमध्ये साधे पाणी घेऊन त्यामध्ये टी-बॅग भीजवा. ती टी-बॅग दुखत असलेल्या दातावर ठेवा. वेदनेपासून आराम मिळेल.

19) फर्नीचर स्वच्छ करण्यासाठी –
लाकडाचे फर्नीचर स्वच्छ करण्यासाठी थोड्या पाण्यात टी-बॅग टाकून उकळून घ्या. यानतंर या चहाच्या पाण्यात स्वच्छ कपडा बुडवून फर्नीचरची स्वच्छता करा. फर्नीचर चमकते.

20) काच स्वच्छ करण्यासाठी –
काच स्वच्छ करण्यासाठी चहाचे पाणी बनवा. या पाण्याने काच स्वच्छ करा. काचेचे डाग दूर होतील आणि काच चमकते.

(टिप : वरील सर्व समस्या आम्ही फक्त माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. प्रत्येक व्यक्तीची शारीरिक क्षमता वेगवेगळी असते. त्यामुळे उपाय करण्यापुर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणे फायदेशीर ठरते.)

Visit : Policenama.com