आता घरबसल्या आपल्या PAN कार्डची पडताळणी करता येणार, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम –  भारतीय नागरिंकासाठी एक महत्त्वपूर्ण डॉक्युमेंट्स म्हणजे पॅन कार्ड (PAN Card) हे उपयुक्त आहे. तसेच आर्थिक व्यवहारासाठी पॅन कार्डचा उपयोग महत्वाचा आहे. कर (Tax) भरण्यासह ओळखपत्र (ID card) म्हणूनही याचा उपयोग होतो. पॅन कार्डामध्ये दहा अंकी क्रमांक असतो. जी आपली ओळख आहे. हे कार्ड प्राप्तिकर विभागाकडून (Income Tax Department) जारी केले जाते. या प्रकरणात आपले पॅन कार्ड पडताळणी करणे आवश्यक आहे.

आपण आपल्या पॅन कार्डची कशी पडताळणी (Verification) कराल?

– आपल्याला अधिकृत प्राप्तिकर वेबसाईट www.incometaxindiaefiling.gov.in जाणे.

– त्यानंतर पोर्टलवर आपला पॅन तपशील पडताळणीवर क्लिक करा.

– तुम्हाला पॅन क्रमांक द्यावा लागेल.

– नंतर आपलं नाव आणि जन्मतारीख एंटर करावी लागेल.

– पुन्हा कॅप्चा कोडभरणे.

– शेवटी तपशील पडताळण्यासाठी सबमिटवर क्लिक करने.

इन्स्टंट पॅन कार्ड कसे मिळवाल-

– प्राप्तिकर विभागाच्या (Income Tax Department) म्हणण्यानुसार, इन्स्टंट पॅन सुविधेअंतर्गत आधार कार्डद्वारे ई-पॅन कार्ड देण्यास सुमारे १० मिनिटे लागतात. या सुविधेअंतर्गत आतापर्यंत सुमारे ७ लाख पॅन कार्ड वितरीत करण्यात आली आहेत.

– पॅन कार्ड मिळविण्यासाठी आपल्याला महत्त्वाच्या कागदपत्रांची गरज असेल.

– पॅन कार्ड मिळविण्यासाठी त्या व्यक्तीकडे ओळख, पुरावा आणि जन्मतारीख असणे आवश्यक आहे. या ओळखपत्रांत आपल्याला अनेक पर्याय दिले जातील. या पुराव्यांसाठी आपण एखाद्या कागदपत्राची निवड करू शकता.

पॅन कार्ड फ्री मिळविण्याचा सोपा मार्ग-

– सर्वप्रथम https://www.incometaxindiaefiling.gov.in/home वर जा.

– येथे डाव्या बाजूला आपल्याला आधारद्वारे इन्स्टंट पॅनचा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करा.

– त्यानंतर एक नवीन पृष्ठ उघडेल जिथे आपल्याला गेट न्यू पॅनचा पर्याय दिसेल. यावरही क्लिक करा

– आता नवीन पानावर आपल्याला तुमचा आधार कार्ड क्रमांक देण्यास सांगितले जाईल. आपला आधार क्रमांक येथे प्रविष्ट करा आणि ‘आय कन्फर्म’ वर क्लिक करा.

– आपल्या नोंदणीकृत मोबाईलवर ओटीपी येईल. साईटवर टाकून त्याची पडताळणी करा.