‘Netflix Party’ वर तुमच्या मित्रांसोबत पहा मोफत चित्रपट आणि वेब सिरीज, कसे ते जाणून घ्या

पोलिसनामा ऑनलाईन – कोरोना महामारीमुळे लोक घरामध्येच बंदिस्थ आहेत. या काळात लोकांना अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या. जसे की, तुम्ही एकटे तुमच्या मित्र आणि परिवाराशिवाय राहू शकता. क्वारंटाईनच्या दिवसांनी खूप काही शिकवले आणि आपण घरच्यांनसोबत आणि मित्रांसोबत व्हर्च्युअली जोडले गेलो. मग ती पार्टी असो अथवा मूवी नाईट, लोक एकमेकांशी जोडले गेले. जर तुम्हीही तुमच्या मित्रपरिवारासोबत असे काही करण्याचा विचार करत असला तर आम्ही तुमच्यासाठी एक शुभवार्ता घेऊन आलो आहोत आणि आम्ही सांगत आहोत की, कसे तुम्ही तुमच्या मित्रांसोबत एकच मूवी अथवा वेब सिरीज एक साथ मोफत बघू शकता.

जर तुम्ही गुगलचा क्रोम ब्राऊजर वापरात असाल तर तुम्हाला एक एक्सटेंशन डाउनलोड करावे लागेल. ज्याचे नाव आहे ‘Netflix Party’. यावरून तुम्ही कोणतीही फिल्म सिरीज प्ले, पोज आणि स्टॉप करू शकता, कारण तुम्हीही त्याचवेळी मूवी पाहू शकता ज्यावेळी तुमचे मित्र अथवा घरचे मूवी पाहत असतील. इतकेच नाही तर यामध्ये तुम्हाला चॅट करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. ज्यामुळे तुम्हाला असे वाटेल की, तुम्ही तुमच्या मित्र-परिवारासोबत मूवी पाहात आहेत.

आता आम्ही तुम्हला काही सोप्या स्टेप सांगणार आहोत ज्यांना फॉलो करून तुम्ही सोप्या पद्धतीने या एक्सटेंशनचा वापर करू शकता.

* सगळ्यात आधी तुमच्या मित्र-परिवाराजवळ नेटफ्लिक्सचे सब्स्क्रिबशन असणे आवश्यक आहे.
* तुम्हाला netflixparty.com वर जावे लागेल आणि ‘Get Netflix Party for free’ वर क्लिक करावे लागेल.
* आता तुम्ही गुगल क्रोमच्या वेब स्टोर पेजवर रिडायरेक्ट होताल आणि येथे तुम्हाला ‘Add To Chrome’ वर क्लिक करा.
* आता तुमच्या समोर एक पॉप-बॉक्स येईल आणि येथे तुम्हाला Add Extension’ सिलेक्ट करावे लागेल. त्यानंतर तुम्हाला तुमच्या ब्राऊजरच्या टूलबारवर ग्रे कलरचा NP लिहलेला एक आयकॉन दिसेल.
* आता तुम्हाला गुगल क्रोमवरून नेटफ्लिक्समध्ये लॉग इन करावे लागेल आणि फिल्मच्या सीरिजला सिलेक्ट करावे लागेल. तुम्हाला दिसेल की, NP आयकॉन जो पहिल्यावेळी ग्रे होतो तो आता रेड झालेला असेल.
* तुम्हाला यावर क्लिक करावे लागेल आणि येथे लिहलेल्या Start the Party ला सिलेक्ट करावे लागेल. यामुळे तुम्ही या मूवी पार्टीच्या होस्ट झालात आणि तुमच्याशिवाय याला कोणी पॉज, प्ले अथवा स्टॉप करू शकत नाही.
* आता तुम्हाला URL निवडावे लागेल आणि तुमच्या मित्रांना पाठवावे लागेल, ज्यांना तुम्हाला इन्व्हाईट करायचे आहे.
* राईट साईडला तुम्हाला चॅट बॉक्स दिसेल. तेथे तुमचे मित्र जॉईन झालेले दिसतील. यानंतर तुम्ही आरामात तुमच्या मित्रांसोबत मूवी पाहू शकता.