सरकारनं दिली सूट, PF अकाऊंटमधून पैसे काढणं झालं सोपं, फक्त ‘या’ 8 स्टेप्स फॉलो करा, जाणून घ्या

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था –   कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (ईपीएफओ) अलीकडेच आपल्या ग्राहकांसाठी काही प्रश्नांची उत्तरे दिली आहेत, जेणेकरून त्यांना EPF खात्यातून पैसे काढताना कोणतीही अडचण येऊ नये. अशात तुम्हाला क्लेमच्या अगोदर या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत जेणेकरुन तुम्ही कोणती चूक करणार नाही. यात EPFO ने माहिती दिली आहे की, पात्रता काय असेल आणि या रकमेवर तुम्हाला कर भरावा लागेल की नाही.

काही दिवसांपूर्वीच सरकारने EPFO नियमांमध्ये शिथिलता दिली होती, जेणेकरून कोरोना व्हायरस महामारी दरम्यान EPFO ग्राहक आपल्या निधीतून काही भाग काढू शकतील.

सरकारने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार कर्मचारी आपल्या EPF खात्यातून ३ महिन्यांपर्यंत पगार किंवा एकूण फंडाच्या ७५% रक्कम काढू शकतात. यातून जी रक्कम कमी असेल, ती काढण्याची मुभा दिली जाईल. पीएफ बॅलन्समध्ये कर्मचारी आणि नियोक्त्यांचे योगदान असेल.

उदाहरणार्थ, जर एखाद्या कर्मचाऱ्याचा पीएफ बॅलन्स ५०,००० असेल आणि त्याचा पगार व महागाई भत्ता दरमहा १५,००० असेल तर ते ३७,५०० रु.पर्यंत पैसे काढू शकतात. ही आगाऊ रक्कम काढण्यासाठी तुम्ही ईपीएफ इंडिया वेबसाइटवर अर्ज करू शकता. असा करा अर्ज…

१.  सर्वात पहिले तुम्हाला EPFO मेंबर पोर्टलवर लॉगइन करावे लागेल. या वेबसाईटची लिंक

https://unifiedportalmem.epfindia.gov.in/memberinterface आहे.

२.  या पोर्टलवर तुम्हाला ड्रॉप डाऊन मेन्यूमध्ये ऑनलाईन सर्व्हिसेस मध्ये जाऊन Claim (Form-31,19,10C & 10D) वर क्लिक करावे लागेल.

३.  पुढे तुम्हाला आपल्या बँक खात्याच्या शेवटच्या ४ डिजिटच्या मदतीने अकाऊंट व्हेरिफाय करावे लागेल.

४.  पुढे “Proceed for Online Claim” वर क्लिक करावे लागेल.

५.  आता इथे ड्रॉप डाऊन मेन्यूमधून PF Advance (Form 31) वर क्लिक करा.

६.  या ड्रॉप डाऊन मेन्यूमध्ये तुम्ही “Outbreak of pandemic (COVID-19)” ला निवडा.

७.  पुढे तुम्हाला आवश्यक रक्कम टाका आणि तुमच्या चेकची स्कॅन कॉपी अपलोड करा आणि तुमचा पत्ता टाका.

८.  यानंतर “Get Aadhaar OTP” द्वारे ओटीपी व्हेरिफाय करा. या व्हेरिफिकेशन नंतर तुमचा क्लेम जमा होईल.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
Cinque Terre
You might also like