कामाची गोष्ट ! आधारकार्ड वरील नाव आणि पत्‍ता बदलणं झालं एकदम सोपं, फक्‍त ‘एवढं’ करा, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आधारकार्ड हे सर्वच गोष्टींसाठी फार महत्वाचे आहे. बँक, गॅस तसेच राशन घेण्यासाठी आज आधार कार्ड मोठा पुरावा आहे. त्यामुळे सरकारच्या सर्वच योजनांचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला आधारकार्ड हे गरजेचे आहे. जर तुम्हाला तुमचे आधारकार्ड अपडेट करायचे असेल तर तुम्हाला आधार सुविधा केंद्रात जावे लागते. तसेच अनेक वेळा मोठ्या रांगांमध्ये देखील उभे राहावे लागते. मात्र आज आम्ही तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने कशाप्रकारे तुम्ही आधारकार्ड अपडेट करू शकता याची माहिती देणार आहोत.

अशाप्रकारे बदला पत्ता –
1) सर्वात आधी कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवर म्हणजेच https://uidai.gov.in वर जा
2) यानंतर होमपेजवर दिसणाऱ्या आधार अपडेट रिक्वेस्ट वर क्लिक करा.
3) त्यानंतर आधार अपडेट करा
4) आधार कार्ड नंबर टाकून लॉग-इन करा.
5) तुमच्या मोबाइलवर आलेला ओटीपी क्रमांक टाकून पोर्टलवर जा.
6) यानंतर तुम्हाला बँक पासबुक, पासपोर्ट आणि रेशन कार्ड किंवा मोडतं कार्डची फोटोकॉपी तुम्हाला अपलोड करावी लागणार आहे. यापैकी कोणत्याही एका कागदपत्राचा फोटो तुम्हाला याठिकाणी अपलोड करायचा आहे.
7) यानंतर तुमच्या मोबाईलवर एक नंबर येईल आणि या नंबरच्या माध्यमातून तुम्ही एकनॉलेजमेंट कॉपी डाउनलोड करू शकता. त्यानंतर तुमची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला या संबंधी माहिती हि मोबाईल क्रमांकावर दिली जाईल.

आधार केंद्रावर जाऊन बदलू शकता पत्ता –

ऑनलाईन बदलांप्रमाणेच तुम्ही आधार केंद्रावर जाऊन देखील तुमचं नाव, जन्मतारीख, पत्ता तसेच इतर बायोमेट्रिक माहिती देखील बदलू शकता.

आधार अपडेटला इतका लागतो चार्ज –

नाव, पत्ता, लिंग, ई-मेल आयडी, मोबाइल नंबर यांसारख्या अपडेटसाठी 50 रुपये घेतले जातात. त्याचबरोबर बायोमेट्रिक माहिती अपडेट करण्यासाठी देखील 50 रुपये शुल्क घेतले जाते.

Visit : policenama.com